Indian Army: ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लाँग-रेंज प्रिसिजन स्ट्राइक चाचणी यशस्वी; दक्षिण कमांडची धडक कामगिरी
Indian Army: ब्रह्मोस क्षेपणास्त्राची लाँग-रेंज प्रिसिजन स्ट्राइक चाचणी यशस्वी; दक्षिण कमांडची धडक कामगिरी
भारतीय लष्कराने बंगालच्या उपसागरात ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची लाँग-रेंज प्रिसिजन स्ट्राइक चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. उच्च अचूकता, स्थिरता आणि ऑपरेशनल तयारीची पुन्हा सिद्धता.
०२ डिसेंबर २०२५ : भारतीय लष्कराने आज ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची लाँग-रेंज प्रिसिजन स्ट्राइक चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करत अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. बंगालच्या उपसागरातील निर्धारित चाचणी क्षेत्रातून ही चाचणी घेण्यात आली. दक्षिण कमांडच्या ब्रह्मोस युनिटने या मोहिमेची जबाबदारी सांभाळली तर अंडमान-निकोबार कमांडमधील त्रि-सेवा दलांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत काटेकोर समन्वयात पार पडलेल्या या लाँचला संरक्षण क्षेत्रात मोठे यश मानले जात आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र अत्याधुनिक मार्गदर्शन प्रणाली आणि कंट्रोल मेकॅनिझमने सुसज्ज असून या चाचणीत त्याने उच्च वेग, स्थिरता आणि शेवटच्या टप्प्यातील अचूक लक्ष्यभेद यांची पुन्हा एकदा सिद्धता केली. निर्धारित लक्ष्यावर अचूक प्रहार करत या मिशनने सर्व ऑपरेशनल उद्दिष्टे पूर्ण केली. simulated battle conditions मध्ये घेतलेल्या या चाचणीने भारतीय लष्कराच्या ब्रह्मोस युनिटची वास्तविक युद्धस्थितीत तात्काळ प्रिसिजन स्ट्राइक करण्याची क्षमता अधिक दृढ झाल्याचे अधोरेखित केले.
दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (PVSM, AVSM) यांनी या यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचे कौतुक करत संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, ब्रह्मोस युनिट्सची ही कामगिरी भारतीय लष्कराच्या रणनीतिक क्षमतांना नवी बळकटी देणारी आहे.
या चाचणीमुळे भारतीय सेनेच्या दीर्घ पल्ल्याच्या प्रिसिजन स्ट्राइक क्षमतेत महत्त्वाची वाढ झाल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या भू-राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक रणांगणात वेग, अचूकता आणि विश्वसनीयता या गुणांचा प्रचंड महत्त्व असतो. ब्रह्मोस प्रणालीने हे सर्व निकष पूर्ण करत पुन्हा एकदा देशांतर्गत विकसित क्षेपणास्त्रांच्या मजबुतीची खात्री दिली आहे.
ब्रह्मोसची ही यशस्वी चाचणी भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमालाही नवी गती देणारी ठरली आहे. देशांतर्गत डिझाइन आणि तंत्रज्ञानावर आधारित असलेली ही क्षेपणास्त्र प्रणाली भारताच्या धोरणात्मक आणि तांत्रिक सामर्थ्याची ठोस ओळख करून देते. संरक्षण उत्पादन क्षमतेत वाढ आणि स्वावलंबनाचा मार्ग हा ब्रह्मोससारख्या यशांमुळेच अधिक बळकट होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
ही चाचणी भारतीय सेनेच्या तयारीची, तत्परतेची आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रत्यक्ष कारवाईने उत्तर देण्याच्या क्षमतेची पुनर्सिद्धता करणारी ठरली आहे. आधुनिक युद्धाच्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींचे अस्तित्व आवश्यक आहे आणि ब्रह्मोसने या संदर्भात पुन्हा एकदा अपूर्व कामगिरी बजावली आहे. लष्कराच्या रणनीतिक दलासाठी हे एक मोठे विक्रमी पाऊल मानले जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information