बारामती नगरपरिषद निवडणूक: उच्च न्यायालयाचा मोठा दणका! तीन उमेदवारांचे अर्ज रद्द, प्रक्रीया पूर्ववत

0
बारामती नगरपरिषद निवडणूक: उच्च न्यायालयाचा मोठा दणका! तीन उमेदवारांचे अर्ज रद्द, प्रक्रीया पूर्ववत

बारामती नगरपरिषद निवडणूक: उच्च न्यायालयाचा मोठा दणका! तीन उमेदवारांचे अर्ज रद्द, प्रक्रीया पूर्ववत


बारामती नगरपरिषद निवडणुकीत मोठा निर्णय! मुंबई उच्च न्यायालयाने तीन उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचा बारामती न्यायालयाचा निकाल रद्द केला. सतीश फाळके आणि अॅड. अविनाश गायकवाड यांचे अर्ज रद्द; निवडणूक प्रक्रिया पूर्वी ठरल्यानुसारच सुरू राहणार.


पुणे १२ डिसेंबर २०२५ : बारामती नगरपरिषद निवडणुकीत मोठा न्यायालयीन कलाटणी देणारा निर्णय समोर आला असून मुंबई उच्च न्यायालयाने बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेला उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा निर्णय रद्द ठरविला आहे. त्यामुळे सतीश फाळके आणि अॅड. अविनाश गायकवाड या दोघांचे अर्ज अखेर रद्द झाले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली असून आगामी निवडणुकीच्या समीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेत अर्ज दाखल करूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली नव्हती. परिणामी सतीश फाळके, अविनाश गायकवाड आणि अली असगर यांनी बारामतीच्या न्यायालयात धाव घेतली होती. या तिघांची बाजू मान्य करत स्थानिक न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले होते. यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आणि ते निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

मात्र या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाने थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आयोगाने मांडलेल्या युक्तिवादात बारामतीच्या न्यायालयाला या प्रकारच्या निर्णयाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले गेले. निवडणूक प्रक्रियेत न्यायालये हस्तक्षेप करू शकत नाहीत, हे नमूद करत त्यांनी स्थानिक न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयानेही आयोगाची भूमिका योग्य असल्याचे मान्य करत बारामती न्यायालयाचा आदेश रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे या उमेदवारांचे अर्ज वैध समजले जाणार नाहीत आणि ते रद्द ठरतील.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्वी ठरल्याप्रमाणेच सुरू राहील आणि कोणताही बदल केला जाणार नाही. त्यामुळे बारामतीतील निवडणूक पूर्ववत मार्गावर आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बिरजू मांढरे आणि अल्ताफ सय्यद यांच्या स्पर्धेवर होणार आहे. सतीश फाळके आणि गायकवाड यांनी यांच्याविरोधात अर्ज दाखल केले होते. मांढरे व सय्यद यांच्या वतीने अॅड. अक्षय महाडिक यांनी उच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला होता.

आता २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने बारामतीत राजकीय तापमान अधिकच वाढले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेतील गोंधळ दूर झाला असला तरी राजकीय समिकरणांवर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. मतदारांच्या नजरा आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्याकडे लागल्या आहेत.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed