पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओचा मोठा कारवाईचा बडगा; 60 हजारांवर दंड

0
पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओचा मोठा कारवाईचा बडगा; 60 हजारांवर दंड

पुण्यात बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओचा मोठा कारवाईचा बडगा; 60 हजारांवर दंड

पुणे आरटीओने १ एप्रिल २०२५ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान ६०,७२१ बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. हेल्मेट न घालणे, पीयूसी, स्पीडिंग, मोबाईल वापर अशा उल्लंघनांवर तब्बल १७ कोटींचे दंड वसूल.

पुणे 0७ डिसेंबर २०२६ : पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओने सखोल कारवाई केली असून सार्वजनिक वाहतुकीसाठी नियम पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (RTO Pune) ने तब्बल ६०,७२१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत हेल्मेट न घालणे, पीयूसी नसणे, स्पीड गन उल्लंघन, मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीटिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, चुकीच्या ठिकाणी पार्किंग, अवैध विमा आणि इतर अनेक नियमभंगांचा समावेश आहे.

आरटीओकडून सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्यांवर करण्यात आली असून १३,०७८ प्रकरणे नोंदवली गेली. त्याचबरोबर पीयूसीचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७,७४२ प्रकरणांमध्ये कारवाई झाली आहे. इतर नियमभंगांमध्ये स्पीड गन २,३४१, सीट बेल्ट न वापरणे १,०२३, अवैध विमा ६,४०१, एमडीएल संदर्भात २,९०४, परवाना संदर्भात १,६८५, फिटनेस ५,५०३, सिग्नल जंपिंग / लेन कटिंग ४२०, चुकीच्या ठिकाणी पार्किंग ६८०, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे ८९६, ओव्हरलोड मालवाहतूक १,१४९, वाहन चालवताना मोबाईल वापरणे १,७८३, रिफ्लेक्टर नसलेले ३,६८१ प्रकरणे नोंदवली गेली.

आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडने करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १७ कोटी १८ लाख २३ हजार रुपये दंड वसूल झाले आहेत. महिन्याच्या हिशोबानुसार एप्रिल महिन्यात १ कोटी ५२ लाख ४० हजार, मे १ कोटी ७८ लाख ९८ हजार, जून १ कोटी ७३ लाख ९९ हजार, जुलै १ कोटी ७१ लाख ६५ हजार, ऑगस्ट १ कोटी ५७ लाख ३५ हजार, सप्टेंबर १ कोटी ७१ लाख २१ हजार, ऑक्टोबर १ कोटी ६४ लाख ०५ हजार, नोव्हेंबर १ कोटी ८५ लाख ४८ हजार, डिसेंबर १ कोटी ८१ लाख ५८ हजार आणि जानेवारी महिन्यात १ कोटी ८१ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल झाला.

आरटीओचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले की, “सार्वजनिक वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नियमांचे उल्लंघन केवळ दंडात्मक कारवाईस कारणीभूत नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठीही धोकादायक आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीटिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा वर्तनामुळे अपघाताची शक्यता वाढते.”

पुण्यातील वाहनचालकांच्या गैरव्यवहारामुळे पादचारी आणि वाहनधारकांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे प्रयत्न असूनही बेशिस्त वाहनचालकांना रोखण्यात आव्हाने आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण करत आहे.

शहरातील नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हेल्मेट वापरणे, पीयूसी अपडेट ठेवणे, वेगमर्यादा पाळणे, सीट बेल्ट वापरणे आणि मोबाईलचा वापर टाळणे हे सर्व घटक फक्त दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीवन वाचविण्यासाठीही अत्यंत आवश्यक आहेत. पुणे आरटीओची सखोल कारवाई या नियमांचे पालन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण इशारा आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *