Mumbai News: बाईईई! मुंबईतील 78 मजली Trump Tower मधील फ्लॅटचं भाडं 10 लाख; किंमत ऐकून नेटकरी थक्क
Mumbai News: बाईईई! मुंबईतील 78 मजली Trump Tower मधील फ्लॅटचं भाडं 10 लाख; किंमत ऐकून नेटकरी थक्क
मुंबईतील वरळी येथील Trump Towers मधील 4.5 BHK अल्ट्रा-लक्झरी फ्लॅटचं महिन्याचं भाडं तब्बल 10 लाख रुपये आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
पुणे १० जानेवारी २०२६ : मुंबईतील वरळी परिसरातील Trump Towers मधील एक अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या भव्य 78 मजली इमारतीतील एका फ्लॅटचे दरमहा भाडे तब्बल 10 लाख रुपये असल्याची माहिती समोर येताच नेटकरी थक्क झाले आहेत. लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Trump Towers मधील हा फ्लॅट सध्या कौतुकापेक्षा अधिक इंटरनेटवरील चर्चेचा आणि विनोदांचा विषय बनला आहे.
हा व्हिडिओ प्रसिद्ध रिअल इस्टेट कंटेंट क्रिएटर रवी केवालरामानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला हा 4.5 BHK फ्लॅट Trump Towers च्या वरच्या मजल्यांपैकी एका मजल्यावर स्थित आहे. या फ्लॅटचा कार्पेट एरिया सुमारे 2900 चौरस फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिशान डिझाइन, प्रीमियम फिनिश आणि उच्चभ्रू सोयीसुविधांमुळे हा फ्लॅट लक्झरी श्रेणीत मोडतो.
हा फ्लॅट सेमी-फर्निश्ड असून त्यामध्ये चार बेडरूम असून प्रत्येक बेडरूमला अटॅच बाथरूम आहे. याशिवाय स्वतंत्र पावडर रूम, स्टाफ रूमसह वॉशरूम, स्वतंत्र युटिलिटी एरिया देण्यात आला आहे. मार्बल फ्लोरिंग, मॉड्युलर किचन कॅबिनेट्स, प्रीमियम बाथरूम फिटिंग्ज, डबल-पॅन विंडोज आणि एअर कंडिशनिंगसारख्या सुविधा या फ्लॅटमध्ये उपलब्ध आहेत. आरामदायी आणि उच्चभ्रू जीवनशैलीचा अनुभव देणाऱ्या या सुविधा पाहता हा फ्लॅट लक्झरी सेगमेंटमध्ये गणला जात आहे.
मात्र इतक्या मोठ्या सोयीसुविधा असूनही 10 लाख रुपये मासिक भाड्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी या भाड्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी मजेशीर कमेंट्स करत या व्हिडिओला व्हायरल केलं आहे. काही युजर्सनी फ्लॅटमध्ये सी-व्ह्यू नसल्याची बाब निदर्शनास आणली आहे. तसेच बाल्कनीचा अभाव आणि अपेक्षेइतकी प्रभावी सीलिंग हाइट नसल्याबाबतही टीका करण्यात आली आहे.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सी-व्ह्यू नाही यार… दुसरा दाखवा,” तर दुसऱ्याने म्हटलं, “या प्राइस पॉइंटवर सीलिंग हाइट आणखी चांगली असायला हवी होती.” याशिवाय एका युजरने केलेली विनोदी कमेंट विशेष चर्चेत आली असून त्याने लिहिलं, “मी हा व्हिडिओ माझ्या अकाऊंटमध्ये उरलेल्या 289 रुपयांसह पाहतोय.”
या फ्लॅटच्या भाड्यामुळे मुंबईतील वाढत्या रेंट कल्चरवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या बदल्यात मिळणाऱ्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, लक्झरी आणि वास्तव यामधील दरी या घटनेतून अधोरेखित होत असल्याचे दिसून येत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information