BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर निवडणुकीला विलंब; महायुतीतील सत्तासंघर्ष आणि ‘हॉटेल डिप्लोमसी’

0
BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर निवडणुकीला विलंब; महायुतीतील सत्तासंघर्ष आणि ‘हॉटेल डिप्लोमसी’

BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर निवडणुकीला विलंब; महायुतीतील सत्तासंघर्ष आणि ‘हॉटेल डिप्लोमसी’

मुंबई महापौर पदाची निवडणूक गटनोंदणी, सत्तावाटप आणि भाजप–शिंदे गटातील मतभेदांमुळे लांबणीवर; फेब्रुवारीपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता.

पुणे 2४ जानेवारी २०२६ : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीबाबत मोठी राजकीय उलथापालथ सुरू असून, ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक बळावली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सत्तास्थापनेच्या समीकरणावर अद्याप एकमत न झाल्याने महापौर निवडीचा पेच कायम आहे. महापालिकेतील राजकारण सध्या वाटाघाटी, गटनोंदणी आणि पदवाटपाच्या गुंत्यात अडकले असून, या सर्वांचा थेट परिणाम महापौर निवडणुकीवर होताना दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून पक्षाला ८९ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या असून दोन्ही पक्ष मिळून ११८ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ११४ चा जादुई आकडा महायुतीकडे असतानाही, महापौर पदावरून एकमत न होणे ही या सगळ्यातील मुख्य अडचण ठरत आहे. त्यातच महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे महिला उमेदवाराच्या नावावरूनही चर्चा सुरू आहे.

प्रशासनाकडून ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महापौर पदाची निवडणूक घेण्याचे संकेत देण्यात आले होते. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यासंदर्भातील सूचना देखील दिल्या होत्या. मात्र, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गटनोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पक्षादेश लागू करण्यासाठी गटनोंदणी ही अत्यावश्यक प्रक्रिया असल्याने, ही नोंदणी पूर्ण न होता निवडणूक घेणे शक्य नाही.

याशिवाय महापौर पदाच्या नावावरून दोन्ही पक्षांमध्ये अजूनही स्पष्टता नाही. भाजप आणि शिंदे गटामध्ये केवळ महापौरच नव्हे, तर स्थायी समिती अध्यक्षपद आणि इतर महत्त्वाच्या पदांच्या वाटपावरही चर्चा सुरू आहे. शुक्रवारी रात्री दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली असली तरी, कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ३१ जानेवारी रोजी निवडणूक न घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, नगरसेवकांच्या फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘हॉटेल डिप्लोमसी’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाने महापौर पदावर ठाम दावा केला असून, अडीच-अडीच वर्षांचे महापौरपद वाटून घेण्याच्या सूत्रावर ते आग्रही असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महापौर पदाबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तोपर्यंत ही प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतर ३१ जानेवारी ही तारीख संभाव्य मानली जात होती, पण सध्याच्या प्रशासकीय आणि राजकीय अडचणी पाहता आता महापौर निवड फेब्रुवारी २०२६ मध्येच होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तोपर्यंत मुंबईच्या सत्तेवर नेमके कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *