Dombivli News: ‘सावंत Shawarma’ स्टॉलवर KDMC कारवाई, मनसेचे अविनाश जाधव मैदानात; एकता सावंत काय म्हणाली?

0
Dombivli News: ‘सावंत Shawarma’ स्टॉलवर KDMC कारवाई, मनसेचे अविनाश जाधव मैदानात; एकता सावंत काय म्हणाली?

Dombivli News: ‘सावंत Shawarma’ स्टॉलवर KDMC कारवाई, मनसेचे अविनाश जाधव मैदानात; एकता सावंत काय म्हणाली?


डोंबिवली स्टेशन परिसरातील मराठी तरुणी एकता सावंतच्या शॉरमा स्टॉलवर KDMC कारवाईनंतर वाद निर्माण झाला असून मनसेचे अविनाश जाधव यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

पुणे 2४ जानेवारी २०२६ : डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात ‘सावंत Shawarma’ नावाने शॉरमा विक्री करणाऱ्या मराठी तरुणी एकता सावंत हिच्या स्टॉलवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईत केवळ मराठी व्यावसायिकालाच लक्ष्य केले जात असून परप्रांतीय फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल घेत राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी भेट देत एकता सावंतला जाहीर पाठिंबा दिला आहे.

एकता सावंत ही डोंबिवली स्टेशनबाहेर शॉरमा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मात्र, केडीएमसी प्रशासनाने तिच्या स्टॉलवर कारवाई करत गाडी हटवली. या कारवाईनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः मराठी तरुणीवरच वारंवार कारवाई केली जात असल्याचा मुद्दा पुढे आला. मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप करत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर एकता सावंत हिने आपली भूमिका स्पष्ट केली. मला परप्रांतीय किंवा मराठी असा कोणताही भेदभाव करायचा नाही. सगळ्यांनी कमवावं आणि मलाही कमवू द्यावं, अशी भावना तिने व्यक्त केली. माझी एकटीची तक्रार करून माझा धंदा बंद करू नका. मी प्रगती करू शकते तर इतरही करू शकतात, त्यामुळे माझ्यावर जळू नका, असंही ती म्हणाली. महापालिकेत माझी तक्रार नेमकी कोणी केली हे मला माहीत नाही. वॉर्ड अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तक्रार पोर्टलवरून येते, एवढीच माहिती मिळाल्याचं एकताने सांगितलं.

एकता सावंत सोशल मीडियावर सक्रिय असून ती आपल्या व्यवसायाचे व्हिडीओ पोस्ट करते. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकते याचाच अनेकांना त्रास होता, असा आरोप तिने केला. मला माझा बिझनेस प्रमोट करायचा आहे, त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडीओ टाकणं गरजेचं आहे. मात्र, केडीएमसी कर्मचाऱ्यांना याच गोष्टीचा जास्त त्रास होत होता, असा दावा एकताने केला. एकता सावंत ही रील स्टार असून तिचे इंस्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

याआधीही अनेक वेळा माझा धंदा बंद करण्यात आला. एकदा तर १०० ते २०० रिक्षावाले एकत्र येऊन माझ्या स्टॉलविरोधात उभे राहिले होते. केडीएमसी कर्मचाऱ्यांनी टपरी फोडून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप एकताने केला. माझी गाडी हटवल्यानंतर मी बाजूच्या शाखेत टपरी देण्याची विनंती केली होती, मात्र ‘आता ते बंद झालं’ असं सांगण्यात आलं, असं ती म्हणाली. आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला, पण भेट होऊ शकली नाही, असंही तिने स्पष्ट केलं.

दरम्यान, एकता सावंतने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडल्यानंतर या प्रकरणाची थेट दखल राज ठाकरे यांनी घेतली. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी भेट देत, राज ठाकरे यांनी मला पाठवलं असून तू बिनधास्त तुझा धंदा लाव, मी मदत करतो, असा शब्द दिल्याचं एकताने सांगितलं. राज ठाकरे आयुक्तांशी चर्चा करतील, असंही अविनाश जाधव यांनी आश्वासन दिल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *