ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकांचा कल स्पष्ट, भाजप आघाडीवर; अजित पवारांची राष्ट्रवादी कितव्या स्थानी?

0
ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकांचा कल स्पष्ट, भाजप आघाडीवर; अजित पवारांची राष्ट्रवादी कितव्या स्थानी?

ZP Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकांचा कल स्पष्ट, भाजप आघाडीवर; अजित पवारांची राष्ट्रवादी कितव्या स्थानी?


Maharashtra Zilla Parishad Election Results 2026: 12 जिल्हा परिषदांच्या निकालांकडे राज्याचे लक्ष. भाजप 7 जिल्ह्यांत आघाडीवर, काँग्रेस-शिंदे शिवसेनेला प्रत्येकी 2; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जिल्हा परिषद मिळण्याची शक्यता.


पुणे ०९ जानेवारी २०२६ : महाराष्ट्रातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज, 9 फेब्रुवारी रोजी जाहीर होत आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली होती. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले असून, आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकत आहे, तसतसा मतदारांचा कल स्पष्ट होऊ लागला आहे.

या निवडणुकीत 12 जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागांसाठी 2 हजार 624 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. तर 125 पंचायत समित्यांमधील 1 हजार 462 जागांसाठी तब्बल 4 हजार 814 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आरक्षणामुळे महिलांसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

मतमोजणी सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांतील सुरुवातीच्या कलांवरून राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

दुपारी 12 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या कलांनुसार भाजप हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भाजप वर्चस्व मिळवू शकतो, असे संकेत आहेत. काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी 2 जिल्हा परिषदांमध्ये आघाडी मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र या निवडणुकीत मर्यादित यश मिळण्याची चिन्हे आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 12 पैकी केवळ 1 जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात राष्ट्रवादीची घसरण आणि भाजपचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

मतमोजणी अद्याप सुरू असल्याने अंतिम निकालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र आतापर्यंतचे कल पाहता, 2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकांनी आगामी विधानसभा राजकारणाची दिशा दाखवून दिली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed