Zilla Parishad Election Result 2026: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या निर्मला नवले जिंकल्या की हरल्या? शिरूरमधून निकाल स्पष्ट
Zilla Parishad Election Result 2026: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या निर्मला नवले जिंकल्या की हरल्या? शिरूरमधून निकाल स्पष्ट
Maharashtra ZP & Panchayat Samiti Election Result 2026: सोशल मीडिया चर्चेत असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा शिरूर पंचायत समिती निवडणुकीत पराभव, भाजपच्या मनीषा पाचंगे विजयी.
पुणे ०९ जानेवारी २०२६ : Maharashtra Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026 अंतर्गत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना, सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांच्या विजय-पराभवाबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून त्यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निर्मला नवले या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या. “रेंज रोव्हर कार घेणं माझं स्वप्न होतं” असे सांगत नवऱ्याने दिलेल्या महागड्या कारसाठी आनंद व्यक्त करतानाचा त्यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर ‘सरपंच पदावर एवढं कमवता येतं हे माहित नव्हतं’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या एका व्हिडीओमुळे निर्मला नवले या राज्यभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
निर्मला नवले या कारेगावच्या माजी सरपंच असून, त्या आयटी इंजिनिअर आहेत. सरपंचपद भूषवल्यानंतर ‘उच्चशिक्षित सरपंच’ म्हणून त्यांचे कौतुकही झाले होते. सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, युट्युब आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्या सक्रिय आहेत. याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या निवडूनही आल्या होत्या.
2026 च्या पंचायत समिती निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा शिरूर पंचायत समितीतील कारेगाव गणातून उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून मनीषा पाचंगे यांना मैदानात उतरवण्यात आले होते. ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र मतमोजणीअंती निर्मला नवले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी कारेगाव गणातून विजय मिळवत निर्मला नवले यांचा तब्बल 2 हजार 700 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या निर्मला नवले यांचा राजकीय प्रवासाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
या निकालानंतर शिरूर तालुक्यात राजकीय चर्चा रंगल्या असून, सोशल मीडिया लोकप्रियता आणि प्रत्यक्ष निवडणूक निकाल यामधील फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information