Palghar News: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा
Palghar News: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा
पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू. पुण्याहून प्रशिक्षणासाठी जात असताना फॉर्च्युनर कार ट्रकला धडकली. मित्र जखमी; पोलीस तपास सुरू.
पुणे १० जानेवारी २०२६ : पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील (वय 27) याचा अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवार (९ फेब्रुवारी) सकाळी १० ते ११ च्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोरजवळ हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात संभाजी पाटीलच्या फॉर्च्युनर कारचा पुढचा भाग ट्रकच्या खाली घुसून गाडी चकचूर झाली.
संभाजी पाटील पुण्याहून गुजरातच्या दिशेने प्रशिक्षणासाठी जात होता. पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश गावाजवळ, भरधाव फॉर्च्युनर कार एका उभ्या अवजड हयावा ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला आणि संभाजी पाटील जागीच ठार झाला.
त्याच्यासोबत प्रवास करत असलेला मित्र प्रणय (यश) प्रशांत चौधरी (वय २२) गंभीर जखमी झाला असून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी मुंढे करत आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारावर, वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे किंवा उभ्या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संभाजी पाटील हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील होते आणि बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी नेमबाजी क्षेत्रात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत.
संभाजी पाटील यांची नेमबाजी कारकीर्द:
- २०१६: कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक (गबाना)
- २०१७: कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सांघिक रौप्य पदक
- २०१८–२०: ऑल इंडिया रेल्वे व मध्य रेल्वे नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदके
- अलीकडेच राष्ट्रीय नेमबाज म्हणून पुन्हा निवड
या अपघातामुळे क्रीडा विश्वावर मोठा धक्का बसला असून, शोककळा व्याप्त झाली आहे. संभाजी पाटील यांचे योगदान आणि त्यांच्या क्रीडा कारकीर्दीमुळे नेमबाजी क्षेत्रात त्यांचा अभूतपूर्व ठसा राहणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information