मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी: Santacruz–Chembur Link रोड लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला

0
Santacruz–Chembur Link रोडचा (SCLR एक्सटेन्शन) केबल स्टे ब्रिज लवकरच वापरात येणार

Santacruz–Chembur Link रोडचा (SCLR एक्सटेन्शन) केबल स्टे ब्रिज लवकरच वापरात येणार

मुंबईकरांसाठी Santacruz–Chembur Link रोडचा (SCLR एक्सटेन्शन) केबल स्टे ब्रिज लवकरच वापरात येणार; मुंबईच्या वाहतूक समस्येवर मोठा उतारा.

सायली मेमाणे

२६ जून २०२५ : मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड एक्सटेन्शन (SCLR Extension) प्रकल्पाचे मुख्य काम पूर्ण केले असून, आवश्यक लोड टेस्टही यशस्वीरीत्या पार पडली आहे. सध्या केवळ माहिती फलक, रंगकाम आणि स्ट्रीट लाइट्स बसवण्याचे शेवटचे टप्प्यातील काम सुरू असून, लवकरच हा केबल स्टे ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्वतः या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला असून, सध्या १००% बांधकाम पूर्ण झालेल्या या पुलामध्ये अंतिम फिनिशिंग सुरू आहे. विशेष म्हणजे, पावसामुळे रखडलेल्या लोड टेस्टिंग प्रक्रिया आता पूर्ण झाल्यामुळे पुलाच्या वापराबाबत कोणतीही अडथळा उरलेली नाही.

या प्रकल्पांतर्गत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर २१५ मीटर लांबीचा एक अद्वितीय केबल स्टे ब्रिज उभारण्यात आला आहे. या पुलामध्ये ९० अंशाचे वळण आणि १०० मीटर त्रिज्येचा वक्र असून तो २२ मीटर उंचीवर आहे. विद्यमान वाकोला उड्डाणपुलाच्या तुलनेत हा ९ मीटर अधिक उंच असून, तो आशियातील १०० मीटर क्षैतिज वक्र असलेला पहिला केबल स्टे ब्रिज म्हणून ओळखला जाणार आहे. हा ब्रिज ओएसडी (Orthotropic Steel Deck) तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला असून, त्यामुळे तो हलका, अधिक टिकाऊ आणि वेगाने बांधता येणारा ठरला आहे.

हा पूल सुरू झाल्यानंतर कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल फ्री मार्ग मिळणार आहे. परिणामी, वाकोला, बीकेसी, एलबीएस मार्ग, तसेच कुर्ला परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा आहे. विशेषतः पश्चिम द्रुतगती मार्गावरून थेट पूर्व द्रुतगती मार्गावर पोहोचण्याचा पर्याय निर्माण होणार आहे.

२०१६ मध्ये सुरू झालेल्या या ६.८४ किमी लांबीच्या एससीएलआर एक्सटेन्शन प्रकल्पाने आता अंतिम टप्पा गाठला असून, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतिकारी बदल घडवण्याची तयारी अंतिम चरणात आहे. केवळ काहीच दिवसांत हा पूल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल आणि हजारो प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *