PRADA वर ‘कोल्हापुरी चप्पल चोरी’चा आरोप! 400 रुपयांच्या चपलेचा 1 लाखांचा ब्रँडेड घोटाळा

0
PRADA वर 'कोल्हापुरी चप्पल चोरी'चा आरोप! 400 रुपयांच्या चपलेचा 1 लाखांचा ब्रँडेड घोटाळा

PRADA वर 'कोल्हापुरी चप्पल चोरी'चा आरोप! 400 रुपयांच्या चपलेचा 1 लाखांचा ब्रँडेड घोटाळा

PRADA ने कोल्हापुरी चप्पलसारखं डिझाईन 1 लाख रुपयांना विकल्याने वाद; हर्ष गोएंका यांचा संताप, स्थानिक कारागिरांची महाराष्ट्र सरकारकडे तक्रार. GI टॅग असलेल्या कोल्हापुरी परंपरेचा आंतरराष्ट्रीय गैरफायदा?

सायली मेमाणे

२७ जून २०२५ : Kolhapuri Chappal Row: PRADA चप्पल चोर! 400 रुपयांची कोल्हापुरी 1 लाखांना; हर्ष गोएंका संतापले, म्हणाले संस्कृतीचा गैरफायदा…

कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चप्पलेला जगभरात ओळख मिळालेली असताना, आता त्या चप्पलचा आंतरराष्ट्रीय ब्रँड PRADAकडून कथित गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय उद्योजक हर्ष गोएंका यांनी प्राडा ब्रँडवर थेट टीका करत आरोप केला आहे की, त्यांनी भारतीय सांस्कृतिक वारशाची कॉपी करून कोल्हापुरी चपलेसारखे डिझाईन लाखो रुपयांना विकायला सुरुवात केली आहे.

ही संपूर्ण घटना एका फॅशन शोमधून उघड झाली. मिलानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका फॅशन शोमध्ये PRADA च्या मॉडेल्सनी जे पादत्राण परिधान केले होते, ते हुबेहूब कोल्हापुरी चप्पलसारखे दिसत होते. हर्ष गोएंका यांनी या फॅशन शोमधील PRADA च्या चप्पलचे फोटो ट्विटर/X वर शेअर केले आणि तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “प्राडा कोल्हापुरी चप्पलंसारखे दिसणारे उत्पादन 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकत आहे. आपले कारागीर तेच चप्पल हाताने 400 रुपयांमध्ये बनवतात. त्यांचे नुकसान होते, तर ग्लोबल ब्रँड आपल्या संस्कृतीतून पैसा कमवत आहेत. दुःखद!”

या प्रकारामुळे कोल्हापूरमधील पारंपरिक कारागिरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी महाराष्ट्र सरकारकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांनी हे देखील नमूद केलं की, कोल्हापुरी चप्पल 12व्या शतकापासून कोल्हापुरात तयार केली जाते आणि 2019 मध्ये भारत सरकारने याला GI (Geographical Indication) टॅग दिला आहे. त्यामुळे या चप्पलचे उत्पादन फक्त कोल्हापुरातच कायदेशीरपणे होऊ शकते.

या वादात आणखी भर टाकत, कारागिरांच्या गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, PRADAच्या कृतीला विरोध दर्शवला. त्यांनी सरकारकडे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून, यामुळे स्थानिक कारागिरांना आर्थिक नुकसान होत असल्याचेही स्पष्ट केले.

या प्रकरणावर अद्याप PRADAकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर लोकांनी जोरदार संताप व्यक्त केला असून, अनेकांनी ही बाब ‘कल्चरल अप्रोप्रिएशन’ म्हणजेच ‘संस्कृतीचा व्यावसायिक गैरफायदा’ असल्याचे म्हटले आहे.

या संपूर्ण घडामोडीमुळे देशभरात लोकांनी कोल्हापुरी चप्पलच्या मूळ निर्मात्यांसाठी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. एकीकडे PRADAसारखा आंतरराष्ट्रीय ब्रँड कोल्हापुरी चप्पलचे रूपांतर ‘लक्झरी प्रॉडक्ट’मध्ये करत आहे, तर दुसरीकडे कोल्हापूरमधील पारंपरिक कारागीर 400 रुपयांमध्ये हाताने मेहनत घेऊन तीच चप्पल तयार करत आहेत.

कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्राची शान आणि भारतीय परंपरेचा एक अमूल्य भाग. त्यामुळे या प्रकारात कायदेशीर कार्यवाही केली जाईल का, GI टॅगचा भंग झाला का, आणि सरकार यावर काय पावले उचलते, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed