पवारांच्या ‘मोदीबागेत’ कुटुंबिक सलोख्याचा प्रयत्न की राजकीय रणनीती?

पवारांच्या 'मोदीबागेत' कुटुंबिक सलोख्याचा प्रयत्न की राजकीय रणनीती?
पुणे २८ एप्रिल २०२६ : पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुण्यातील ‘मोदीबाग’ या निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांचा मोठा स्नेहमेळावा रंगणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाल्याच्या आनंददायी पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संपूर्ण कुटुंबाला स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले आहे. राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबात उभी फूट पडलेली असताना, या कौटुंबिक कार्यानिमित्त सर्व सदस्य एकाच छताखाली येणार असल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा रंगली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह नागपूर येथील प्रसिद्ध व्यावसायिक सारंग लखानी यांच्याशी ठरला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा शुभविवाह येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. नातीच्या लग्नाची बातमी साजरी करण्यासाठी आणि आगामी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी शरद पवारांनी राजकीय तसेच अराजकीय क्षेत्रातील कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावले आहे. या निमित्ताने पवारांच्या घरी पुन्हा एकदा कौटुंबिक गराडा पाहायला मिळणार आहे.
या स्नेहभोजनासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनाही विशेष निमंत्रण धाडण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सुनेत्रा पवार काही अपरिहार्य कारणांमुळे या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे समजते. यामुळे या मेळाव्यात सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय संघर्षाच्या वातावरणात होणाऱ्या या स्नेहभोजनात केवळ लग्नाची चर्चा होणार की काही राजकीय खलबतेही शिजणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीयांकडून हा पूर्णतः खाजगी आणि कौटुंबिक सोहळा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंबातील जिव्हाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare