पुण्यात मद्यपी वाहनचालकांवर धडक कारवाई 3 दिवसांत 198 जणांवर गुन्हे, 85 जणांचे समुपदेशन

0
पुण्यात मद्यपी वाहनचालकांवर धडक कारवाई 3 दिवसांत 198 जणांवर गुन्हे, 85 जणांचे समुपदेशन

पुण्यात मद्यपी वाहनचालकांवर धडक कारवाई 3 दिवसांत 198 जणांवर गुन्हे, 85 जणांचे समुपदेशन

पुणे वाहतूक पोलिसांची 8–10 मे दरम्यान विशेष मोहीम; 30 नाकाबंदी पॉईंटवर ब्रेथ अॅनालायझर तपासणी. 198 मद्यपी चालकांवर कारवाई. 11 मे रोजी येरवडा येथे 85 जणांचे समुपदेशन, रस्ते सुरक्षिततेवर भर.

पुणे ११ मे २०२६ : पुणे शहरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध पुणे शहर वाहतूक विभाग यांनी 8 ते 10 मे 2026 दरम्यान विशेष मोहीम राबवली. शहरातील विविध भागांमध्ये एकूण 30 नाकाबंदी पॉईंट उभारून ब्रेथ अॅनालायझरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.

या धडक कारवाईत एकूण 198 वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले. संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश अपघातांना आळा घालणे, रस्ते सुरक्षितता वाढविणे आणि जबाबदार वाहन संस्कृती निर्माण करणे हा होता.

कारवाईनंतर 11 मे रोजी समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे शहर पोलीस यांच्या वाहतूक शाखेच्या येरवडा येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात पार पडला. या समुपदेशनासाठी 85 मद्यपी वाहनचालक उपस्थित होते. माननीय पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरणाद्वारे उपस्थितांना मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे धोके, कायदेशीर परिणाम आणि सामाजिक जबाबदारी याबाबत माहिती देण्यात आली.

वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे गंभीर व दंडनीय कृत्य आहे. अशा कृतीमुळे अपघातांचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed