• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

Ashadhi Wari 2025 पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांना लुटलं; दौंड हादरलं

Jun 30, 2025
पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांना लुटलं; दौंड हादरलंपंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांना लुटलं; दौंड हादरलं

Ashadhi Wari 2025 दरम्यान पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये वारकऱ्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.

सायली मेमाणे

पुणे 30 जून २०२५ :
Pune Crime : महाराष्ट्रातील लाखो भक्तांसाठी श्रद्धेचा महाउत्सव असलेल्या आषाढी वारीमध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पंढरपूरच्या दिशेने जात असलेल्या वारकऱ्यांना अडवून त्यांना लुटले गेले आणि एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड परिसर हादरला असून, वारकरी समुदायात संतापाचे वातावरण आहे.

स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे वारकरी थांबले होते. थोड्याच वेळात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी वारकऱ्यांच्या गळ्यावर कोयता ठेवत धमकी दिली आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने लुटल्या. त्यानंतर त्यांनी वारकरी गटातील अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे. पोलिसांसमोर सध्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे या आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा करणे.

या संतापजनक घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये अस्वस्थता वाढली असून, अशा पवित्र वारीत अशा प्रकारांमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात्रा मार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये आणखी एका फसवणुकीचा प्रकार उघड झाला होता. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना १०० रुपयांत दर्शन पास मिळतो, असे सांगून सासवड परिसरात डुप्लिकेट पास बनवून दिले गेले. जेव्हा हे भाविक विठ्ठल मंदिरात पोहोचले तेव्हा स्कॅनिंग करताना पास बोगस असल्याचे उघड झाले. यावर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत भाविकांची चौकशी केली. हे पास कोणी आणि कुठून दिले, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Ashadhi Wari 2025 हा भक्तांसाठी श्रद्धेचा विषय असताना, अशा घटना पवित्रतेला गालबोट लावणाऱ्या ठरतात. वारकऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी, अशी मागणी वाढत आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune