• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

पुण्यातून फरार मोक्का आरोपीला १० महिन्यांनंतर अटक; युनिट-४ ची मोठी कामगिरी

Jun 30, 2025
खंडणी, तोडफोड व गंभीर दुखापतप्रकरणी १० महिन्यांपासून मोक्यातले फरार आरोपीला गुन्हे शाखे कडून अटकखंडणी, तोडफोड व गंभीर दुखापतप्रकरणी १० महिन्यांपासून मोक्यातले फरार आरोपीला गुन्हे शाखे कडून अटक

रिपोर्टर : झोहेब शेख


पुण्यातील खंडणी, तोडफोड व गंभीर दुखापतीप्रकरणी मोक्का लावलेला आरोपी संदीप केंदळेला गुन्हे शाखा युनिट-४ ने सोलापूरच्या कुर्डवाडीतून अटक केली. तपशील वाचा.

30 जून २०२५ पुणे : खंडणी, तोडफोड व गंभीर दुखापतीसारख्या गुन्ह्यांप्रकरणी तब्बल १० महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्याच्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. संदीप गौतम केंदळे (वय ३४, रा. एसआरए बिल्डिंग, विमाननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी येथे तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले.

गुन्हे शाखा युनिट-४ चे पथक नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद महाजन आणि पोलीस नाईक नागेश सिंग कुवर यांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी कुर्डवाडीत लपून बसलेला आहे. ही माहिती मिळताच पथकाने तत्काळ कारवाई करून स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने सापळा रचून आरोपीला अटक केली.

संदीप केंदळे याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४८१/२०२४ नुसार भारतीय दंड विधान (भादंवि) कलम ३०८(४), १८९(२), १९१(२)(३), १९०, ३५२, ३५१(३) तसेच शस्त्र कायदा कलम ४(२५), क्रिमिनल लॉ कलम ०७, आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune