मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की राज्यातील ३३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले गेले असून, मुंबईत एकाही ठिकाणी आता भोंगा नाही.
सायली मेमाणे
मुंबई १२ july २०२५ : Devendra Fadnavis: राज्यात 3367 धार्मिक स्थळे भोंगेमुक्त; विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा दावा, नवीन भोंगे आढळल्यास कारवाई होणार
महाराष्ट्रातील तब्बल 3367 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून, त्यामध्ये मुंबईतील 1608 स्थळांचा समावेश आहे. सध्या मुंबईतील एकाही धार्मिक स्थळी भोंगा उरलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या मोहिमेचा भाग म्हणून राज्यभर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर पोलिसांच्या फिरत्या पथकांमार्फत देखरेख केली जाणार आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, मुंबई पोलिसांनी 1608 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवताना कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ दिला नाही. चर्चेनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानुसार समंजसपणे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकाही प्रकरणात FIR दाखल करण्याची गरज पडली नाही. राज्यभरातील भोंगे हटवण्यात आलेल्या स्थळांमध्ये 1149 मशिदी, 48 मंदिरे, 10 चर्च, 4 गुरुद्वारे आणि 147 इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. राज्य सरकारने भोंग्यांविषयी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार केली असून त्याची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. कुठेही नवीन भोंगे लावले गेले, तर संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
सणांच्या कालावधीत, जसे की गणेशोत्सव, शिमगोत्सव यामध्ये तात्पुरत्या परवानगीच्या आधारे रात्री 12 वाजेपर्यंत भोंग्यांचा वापर करता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र, उघड्यावर भोंगे लावून आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे. त्यांनी उदाहरणादाखल गुजरातमधील साउंडप्रूफ मंडपांमध्ये नवरात्र साजरी केली जाते, याचा उल्लेख केला.
ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंकडून विनंती आल्यास त्यांच्या सणांसाठीही योग्य परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच, राष्ट्रीय उद्यानांमधील ध्वनीप्रदूषण थांबवण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये फिरती पथके स्थापन करण्यात येणार आहेत जे भोंग्यांचा वापर तपासतील आणि आवश्यक असल्यास तात्काळ कारवाई करतील.
विधानसभेत आमदार सना मलिक यांनी डेसिबल मर्यादेबाबत केंद्र सरकारकडे बदल करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, हा विषय महत्त्वाचा असून राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करून ध्वनिप्रदूषण कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करेल. सांगलीत गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याची यशस्वी अंमलबजावणी झाली असून, महाराष्ट्रात कायद्याचा चाप बसवला जाईल आणि भावनिक गोष्टीही समजून घेऊन सुटल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte