लोणावळ्याजवळील मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर ट्रकमधील लोखंडी पाईप पडल्यामुळे २ महिलांचा मृत्यू, ५ प्रवासी जखमी; पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास लोणावळ्याजवळील मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर एक भीषण अपघात घडला. एका ट्रकमधून वाहतुकीदरम्यान लोखंडी पाईप अचानक वाहून पडली आणि मागून येणाऱ्या स्कूटर व कारवर पडल्यामुळे दोन महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले .
पीडितांमध्ये ऋतुजा चव्हाण (वय २६) आणि अंकिता शिंदे (वय २८) यांचा मृत्यू झाला. तर वैभव गलांडे (वय २९), लता शिंदे (वय ५०), ललित शिंदे (वय ३१), सोनाली खडतरे (वय ३०), शिवराज खडतरे (वय ६) हे जखमी करण्यात आले असून त्यांना खोपोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
घटनेची माहिती मिळताच Bhor Ghat पोलिस आणि स्थानिक मदत संघ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासह बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत. देवदूत संस्था आणि स्वयंसेवकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
प्राथमिक तपासात ट्रकमालकांनी पाईप घट्ट बांधून ठेवली नसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात अपघातापासून बचावासाठी आवश्यक दक्षता न घेतल्याचे धोके लक्षात घेता गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातामुळे महामार्गावर जवळपास एक तास वाहतूक कोलमडली होती, ज्यावर पोलिस आणि स्थानिक मदतसंस्था यांनी त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक पुन्हा सुरु केली असे पोलिसांनी सांगितले आहे .
ही घटना नुसती अपघात नाही, तर वाहतुकीतील चालकांची जबाबदारी, ट्रक मालमत्तेची सुरक्षितता आणि रस्त्यावरील प्रवाशांचा जीव वाचविण्याबाबतचा गंभीर प्रश्न उपस्थित करते. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या देखरेखखाली चालू आहे .
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte