• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

Thane Crime: घोडबंदरमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या; रिक्षाचालक अटकेत, गुन्ह्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात

Jul 14, 2025
ठाण्यात घोडबंदर रस्त्यालगत निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळलाठाण्यात घोडबंदर रस्त्यालगत निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

ठाण्यात घोडबंदर रस्त्यालगत निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला; आरोपी रिक्षाचालक अटकेत, पोलिस तपास सुरूच.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : ठाण्यातील घोडबंदर परिसरात 5 जुलै 2025 रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळ्याभोवती ओढणी आवळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही खळबळजनक घटना वाघबीळ गावाकडे जाणाऱ्या एका दुर्गम रस्त्याजवळील बांधकाम साईटजवळ घडली. पोलिस तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले असून, ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने समाधान सूर्यवंशी (वय 40) या रिक्षाचालकाला अटक केली आहे.

मृत मुलीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, त्याच दिवशी कळवा पोलिस ठाण्यात तिच्या अपहरणाबाबत गुन्हा नोंद झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी आणि इतर अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाने तपासाच्या दरम्यान परिसरातील CCTV फुटेज मिळवले आणि त्यावरून 4 जुलै रोजी ही मुलगी घरातून बाहेर पडलेली दिसली. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ती एका रिक्षात बसताना आढळून आली होती. पोलिसांनी त्या रिक्षाची ओळख पटवून, तांत्रिक तपासाच्या आधारे समाधान सूर्यवंशी याला अटक केली.

सूर्यवंशी ठाण्यातील लोकमान्य नगर भागात राहत असून, तो मागील 12 वर्षांपासून रिक्षा चालवत होता. पोलिस तपासात समोर आले की, 4 जुलै रोजी त्याने पीडितेला रिक्षामध्ये बसवून मानपाडा, भिवंडी आणि इतर ठिकाणी फिरवले. त्यानंतर घोडबंदरजवळील निर्जनस्थळी नेऊन ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह तेथेच टाकून फरार झाला.

विशेष बाब म्हणजे, आरोपी व पीडिता यांच्यात पूर्वी कोणतेही संबंध नव्हते. त्यामुळे खून करण्यामागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत असून, आरोपीला न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या हत्येने ठाण्यात आणि राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईल तपासणीसह, या घटनेमागे कोणतेही इतर सहकारी आहेत का, हे शोधले जात आहे. या प्रकरणात लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune