पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा प्राथमिक वॉर्ड आराखडा १४ जुलै रोजी प्रसिद्ध; नागरिकांना २१ जुलैपर्यंत आक्षेप व सूचना सादर करता येणार.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : ड्राफ्ट वॉर्ड आराखडा प्रसिद्ध; ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सूचना २१ जुलैपर्यंत मागविण्यात
पुणे : जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी वॉर्ड रचनेसंदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने १३ पंचायत समित्यांअंतर्गत निवडणूक विभाग आणि मतदार यादींसाठीचा प्राथमिक (ड्राफ्ट) वॉर्ड आराखडा १४ जुलै २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.
हा आराखडा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पुणे, सर्व तालुका कार्यालये, तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या कार्यालयांच्या सूचना फलकावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवरही तो पाहता येऊ शकतो.
या प्राथमिक आराखड्यावर नागरिक आपले आक्षेप व सूचना २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात सादर करू शकतात. त्यानंतर प्राप्त सूचना व आक्षेप तपासून जिल्हाधिकारी २८ जुलै २०२५ पर्यंत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव व अभिप्रायासह पुढे पाठवतील.
विभागीय आयुक्त ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्राप्त आक्षेप व सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर अंतिम वॉर्ड रचना १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे किंवा अधिकृत अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.
ही माहिती जिल्हा व पंचायत समिती निवडणूक २०२५ साठी समन्वय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून जाहीर करण्यात आली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter