• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

मुंबई विमानतळावर ६२ कोटींचे कोकेन जप्त; ओरिओ बॉक्समध्ये लपवून दोहाहून आणलेले ड्रग्स DRI ने पकडले

Jul 16, 2025
मुंबई : दोहा वरून आलेल्या महिलेकडे ६२ कोटींचा कोकेन साठामुंबई : दोहा वरून आलेल्या महिलेकडे ६२ कोटींचा कोकेन साठा

मुंबई विमानतळावर दोहावरून आलेल्या महिलेच्या ताब्यातून ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट बॉक्समध्ये लपवलेले ₹६२.६ कोटींचे ६.२ किलो कोकेन DRI ने जप्त केले. NDPS कायद्यानुसार कारवाई; ड्रग्स नेटवर्कच्या तपासाला गती.

सायली मेमाणे

पुणे १६ जुलै २०२५ : 🟪 मुंबई : दोहा वरून आलेल्या महिलेकडे ६२ कोटींचा कोकेन साठा; ओरिओ बिस्किटांच्या बॉक्समध्ये छुपवलेली ड्रग्स जप्त

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी दोहा (कतार) वरून परतलेल्या एका भारतीय महिलेकडून तब्बल ₹६२.६ कोटी किमतीचा ६.२ किलो कोकेन साठा जप्त केला आहे. हे कोकेन ओरिओ बिस्किट आणि चॉकलेटच्या बॉक्समध्ये हुशारीने लपवण्यात आले होते.

DRI च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ही महिला १४ जुलै रोजी मुंबईत उतरताच तिला अडवण्यात आले. तपासणी दरम्यान तिच्या बॅगेत ६ मोठे ओरिओ बॉक्स आणि ३ चॉकलेटच्या पेट्या आढळून आल्या. त्यामध्ये ३०० पांढऱ्या पावडरने भरलेल्या कॅप्सूल्स आढळल्या. प्राथमिक चाचणीत त्या पावडरचे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात NDPS कायद्यानुसार कारवाई करत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट किंवा कोरियर नेटवर्कबाबत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

DRI मुंबईकडून गेल्या एक महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. याआधी ८ जुलै रोजी त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८ किलो हायड्रोपोनिक गांजाची ₹१२ कोटी किंमतीची तस्करी रोखण्यात आली होती. त्या वेळी बँकॉकहून आलेल्या प्रवाशाने ही ड्रग्स पर्सनल बॅगेजमध्ये व्हॅक्युम सील पॅकेट्समध्ये लपवून आणली होती.

DRI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रग तस्कर अत्यंत चतुराईने अंमली पदार्थ लपवत आहेत, पण भारतातील सुरक्षा यंत्रणा त्यांना टक्कर देण्यासाठी तितक्याच प्रगत होत आहेत. “आपण जागतिक संस्थांशी समन्वय साधत आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचे उच्चाटन करण्यासाठी सज्ज आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune