• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्ध; अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

Jul 16, 2025
रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्धरवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी २५% सवलतीत उपलब्ध

मराठी संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर आता २५ टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे. ही सवलत बालनाट्यांसाठीही लागू असून वर्षभर निवडक सत्रांमध्ये लाभ घेता येणार.

सायली मेमाणे

मुंबई १६ जुलै २०२५ :: मराठी संगीत रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर मराठी संगीत नाटकांसाठी आता २५ टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ‘कोहम् सोहम्’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली.

हे पुस्तक ज्येष्ठ गायक व अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींवर आधारित असून तपस्या नेवे यांनी त्याचे संपादन केले आहे. या प्रकाशन सोहळ्यास नयना आपटे, अजित कडकडे, रामदास भटकळ, दिनेश पिळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अ‍ॅड. शेलार म्हणाले की, “मराठी संगीत नाटकांची परंपरा टिकवण्यासाठी शासनाने रवींद्र नाट्य मंदिराच्या मुख्य नाट्यगृहातील २४ सत्रे आणि लघुनाट्यगृहातील १२ सत्रे शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी सकाळी ९.३० ते २ या वेळेत २५ टक्के सवलतीत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत मराठी बालनाट्यांसाठीही लागू राहील.”

हे सत्र वर्षातून एका संगीत नाटक किंवा बालनाट्य निर्मितीसाठी दोन वेळा सवलतीच्या दरात दिले जातील. दुपारी २ नंतरची सत्रे मात्र व्यावसायिक नाटकांसाठीच खुली राहतील.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune