• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

राजस्थानातील अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी पुण्यात अटकेत

Jul 17, 2025
राजस्थानातील अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी पुण्यात अटकेतराजस्थानातील अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी पुण्यात अटकेत

राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या दोन आरोपींना पुण्यात चंदननगर पोलिस व गुन्हे शाखा युनिट २ ने अटक केली.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे १७ जुलै २०२५ : – चंदननगर पोलिस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट २ यांनी संयुक्त कारवाई करत राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या दोन आरोपींना पुण्यातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी लाला रामु बमनिया (वय २२, रा. बाँसवाडा, राजस्थान) आणि सुरेश (वय १९, रा. बाँसवाडा, राजस्थान) हे चंदननगर परिसरात लपून राहत होते व स्थानिक चहाच्या दुकानात काम करत असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली होती.

या घटनेत राजस्थानमधील लोहारीया पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले गेले होते व तिच्यावर अत्याचार झाला होता. याप्रकरणी लोहारीया पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम १३७ (२), ६५ (१), तसेच पोक्सो कायदा कलम ३, ४ आणि बाल न्याय (जे. जे. अ‍ॅक्ट) कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १५ जुलै २०२५ रोजी, राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली आणि गुन्हे शाखा युनिट २ चे निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या पथकाने शोधमोहीम हाती घेतली. आरोपी हे चंदननगर बाजार भागात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पथके रवाना करून तुकारामनगर, खराडी येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी या आरोपींना राजस्थान पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. या यशस्वी कारवाईसाठी पुणे शहराचे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्री. सोमय मुंडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक व सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट २ चे अंमलदार गुरव, गोणे, उकिरडे, घाडगे, लहाने, कदम, सुर्यवंशी, पवार, खराडे, कांबळे, मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune