• Fri. Jul 18th, 2025

NewsDotz

मराठी

सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई: तीन पिस्तूल, तीन काडतुसे जप्त; चार आरोपी ताब्यात

Jul 18, 2025
सिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई: तीन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व चार आरोपी ताब्यातसिंहगड रोड पोलिसांची मोठी कारवाई: तीन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे व चार आरोपी ताब्यात

पुणेतील सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. यामध्ये दोन विधीसंघर्षित बालकांचाही समावेश आहे.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे १८ जुलै २०२५ : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने एका मोठ्या कारवाईत रेकॉर्डवरील दोन विधीसंघर्षित बालकांकडून व दोन आरोपींकडून तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एकूण १,२१,००० रुपयांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

४ जुलै रोजी पीएसआय संतोष भांडवलकर आणि पोलीस अंमलदारांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सिंहगड रोड कॉलेजजवळील क्रिकेट ग्राउंड शेजारी एका संशयित इसमास ताब्यात घेतले. तो एक विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ४०,००० रुपये किमतीचे पिस्तूल व १,००० रुपयांचे जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने आणखी एक विधीसंघर्षित बालक व अनिकेत महादेव सोनवणे (वय २६, रा. तुळजापूर) यांचे नाव उघड केले. पोलीसांनी अनिकेतला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दुसरे पिस्तूल जप्त केले.

दरम्यान, सिंहगड रोड पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यांत फरार असलेला किरण विठ्ठल शिंदे (वय २३, रा. वडगाव बुद्रुक) यालाही अटक केली असून, त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे आणि गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या सूचना आणि पीएसआय संतोष भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune