पुणे ग्रामीणच्या लोणावळा परिसरात ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या अनोळखी आरोपीला फक्त २४ तासांत अटक. गुन्हा दाखल, तपास सुरू.
पुणे १८ जुलै २०२५ : पुणे ग्रामीणमधील लोणावळा परिसरात एका ३३ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस केवळ २४ तासांत अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही गंभीर घटना १५ जुलै २०२५ रोजी ठाकुरसाई गावात घडली. संबंधित महिला रस्त्याने चालत असताना अनोळखी इसमाने दुचाकीवरून तिचा पाठलाग करत रस्त्यात आडवून जंगली भागात नेले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४ व ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह गिल्ल यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक दिनेश तायडे (लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली शोधपथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तत्पर तपासाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यात आला आणि २४ तासांत आरोपीस अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव बालु दत्तु शिर्के असून तो जिवन नं. ०१, मावळ तालुका, पुणे येथील रहिवासी आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक करण्यात आली आहे. या यशस्वी कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व तपास पथकाचे समन्वय महत्त्वाचे ठरले.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे या करत असून, आरोपीवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या जलद व निष्कलंक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter