• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण आणि मारहाण; सेल्फीच्या बहाण्याने घडली घटना

Jul 24, 2025
सेल्फी काढण्याच्या बहाण्याने अपहरण आणि मारहाण; हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर हल्लासेल्फी काढण्याच्या बहाण्याने अपहरण आणि मारहाण; हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर हल्ला

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना सेल्फीच्या बहाण्याने गाडीत ओढून अपहरण करून चौघांनी मारहाण केली. धाराशिवकडे नेताना त्यांच्या जीवावरही उठल्याचा आरोप. वाचा संपूर्ण घटना.

सायली मेमाणे

पुणे २४ जुलै २०२५ : हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने अपहरण करून जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागेश मडके यांना जबरदस्तीने गाडीत बसवून धाराशिवकडे नेत असताना गाडीतच चौघा ते पाच जणांनी मारहाण केली. मडके यांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी त्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू झाला आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नागेश मडके हे हॉटेल बाहेर उभे असताना एक चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून काही तरुण खाली उतरले आणि त्यांनी मडके यांच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. मात्र, ही एकपूर्वनियोजित योजना असल्याचे पुढे समोर आले. सेल्फीच्या निमित्ताने त्यांनी मडके यांना गाडीत बसवून घेतले आणि नंतर गाडीतच त्यांना बेदम मारहाण सुरू केली.

नागेश मडके यांनी या हल्ल्याची आणि अपहरणाची माहिती दिली असून, ते म्हणाले की मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्यांना वडगाव पुलाजवळ फेकून दिलं. नंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांना फोन करून घटनेची माहिती दिली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे हल्लेखोर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने आले होते.

या घटनेनंतर मडके यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे ठरवले आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हॉटेल भाग्यश्रीचे नाव काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत होते, कारण मालकाने अलीकडेच एक नवीन फॉर्च्यूनर कार खरेदी केली होती. याच कारमुळे काही लोकांमध्ये असूया निर्माण झाल्याचा संशय आहे.

ही घटना केवळ व्यक्तिगत हल्ला नाही, तर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या व्यावसायिकांवरील धोक्याचे संकेत देणारी आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून हल्लेखोर लवकरच गजाआड जातील अशी अपेक्षा नागेश मडके यांनी व्यक्त केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune