अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीची पहिली यादी आता सोमवारी (१५ जुलै) प्रसिद्ध होणार आहे. ऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे ही यादी विलंबाने जाहीर होणार असून अधिकृत वेबसाइटवर तपशील पाहता येणार.
सायली मेमाणे
पुणे २६ जुलै २०२५ : अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीची पहिली यादी आता थेट सोमवारी (१५ जुलै) प्रसिद्ध होणार आहे. मूळ वेळापत्रकानुसार ही यादी आज (शनिवारी) प्रसिद्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर (11thadmission.org.in) तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
विशेषतः कला शाखेची किमान यादी (cut-off list) जाहीर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू असला, तरी अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पोर्टलवर कॉलेजची कट ऑफ लिस्ट दिसत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड लक्षात घेता शिक्षण विभागाने निर्णय घेऊन पहिली यादी सोमवारी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एकूण ३ फेऱ्यांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या यादीत ज्यांचे नाव असेल त्यांनी निश्चित वेळेत प्रवेश घेणे बंधनकारक असेल. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलवरूनच आपली यादी पाहता येणार असून या अधिकृत संकेतस्थळावरूनही प्रवेशाची माहिती मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. अधिकृत संकेतस्थळावरूनच प्रवेश प्रक्रिया संबंधित सर्व अद्ययावत माहिती दिली जाईल. सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगण्याची आणि पुन्हा लॉगिन करून यादी तपासण्याची सूचना दिली जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter