येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ने केली अटक

0
येरवडा : पोलिसांच्या तत्परतेने घातक शस्त्राने मारहाण करणारा आरोपी गजाआड

येरवडा : पोलिसांच्या तत्परतेने घातक शस्त्राने मारहाण करणारा आरोपी गजाआड

येरवडा परिसरात घातक शस्त्राने मारहाण करून फरार झालेल्या विवेक उर्फ मीट्या गवळी या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने अटक केली.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे 30 जुलै २०२५ : येरवडा : पोलिसांच्या तत्परतेने घातक शस्त्राने मारहाण करणारा आरोपी गजाआड

पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातक शस्त्राने मारहाण करून पसार झालेल्या एका आरोपीस अटक केली आहे. आरोपीचा शोध घेत असतानाच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीतून ही धडक कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस कर्मचारी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार देविदास वांढरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, विवेक उर्फ मीट्या प्रकाश गवळी (वय २१, रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीच्या मागे, येरवडा, पुणे) हा सध्या ग्यानबा मोझे शाळेच्या आवारात थांबलेला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे युनिट-४ च्या पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी धाव घेत आरोपीस पकडले.

त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने स्वत:चे नाव व पत्ता स्पष्ट सांगितले. यानंतर येरवडा पोलीस ठाण्याकडून तपासणी केली असता आरोपीविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३१३/२०२५ अन्वये भारतीय दंड विधान संहिता कलम ११८(२), १८९, १०९, १९१, १११, तसेच क्रिमिनल लॉ ३ व ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह कलम १३ अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

घटनास्थळी अटक केल्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कार्यवाहीमुळे एक गंभीर गुन्हेगार गजाआड झाला असून यामुळे परिसरात निर्माण झालेली दहशतीची भावना कमी होण्यास मदत होईल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने केली. पोलीस अंमलदार देविदास वांढरे यांच्या दक्षतेमुळे ही माहिती मिळवून योग्य वेळेत कारवाई करता आली, याबद्दल वरिष्ठांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे. पुणे शहरातील नागरिकांनी देखील पोलिसांच्या या कृतीचे स्वागत करत गुन्हेगारीविरोधातील प्रयत्नांत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed