पुण्यात भवानी पेठेतून विनापरवाना पिस्तुलसह युवक अटक; गुन्हे शाखेची कारवाई

0
पुण्यात गावठी पिस्तूलसह युवक अटकेत; गुन्हे शाखेच्या कारवाईचा मोठा यश

पुण्यात गावठी पिस्तूलसह युवक अटकेत; गुन्हे शाखेच्या कारवाईचा मोठा यश

पुण्यात भवानी पेठ येथे विनापरवाना गावठी पिस्तुल व ६ जिवंत काडतुस बाळगणाऱ्या २० वर्षीय जितु मंडलिक याला गुन्हे शाखा युनिट-१ ने अटक केली. आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

रिपोर्टर : झोहेब शेख

पुणे 30 जुलै २०२५ : पुण्यात भवानी पेठेतील जुन्या मोटर स्टँडजवळ मोठी पोलिस कारवाई करण्यात आली असून, एक २० वर्षीय तरुण विनापरवाना गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१ विभागातील पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीप्रमाणे, जितु रवि मंडलिक (वय २०, रा. द साईट अपार्टमेंट, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) हा भवानी पेठेतील जुन्या मोटर स्टँडजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना सदर माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच संशयास्पद व्यक्तीवर नजर ठेवली आणि वर्णनाशी सुसंगत इसम असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, पॅंटच्या आतील बाजूस कंबरेजवळ ४०,००० रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व खिशात ६,००० रुपये किंमतीच्या ६ जिवंत काडतुस सापडल्या. या अवैध शस्त्रांच्या आधारे त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गु.र.नं. ३९७/२०२५, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(२)(३) सह १३५ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सपोनि दीपक बर्गे व पोलीस कर्मचारी राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश साबळे, शुभम देसाई व उमेश मठपती यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे पुण्यातील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता असून, पोलिसांच्या दक्षतेमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला.

शहरातील अवैध शस्त्रसाठा रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक सातत्याने गुप्त माहितीच्या आधारे कार्यरत असून, भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *