भिगवण येथून २७ वर्षीय तरूण बेपत्ता; कुटुंबीय आणि पोलिस तपासात गुंतले

0
भिगवण येथून २७ वर्षीय तरुण बेपत्ता, पोलीस तपास सुरू

भिगवण येथून २७ वर्षीय तरुण बेपत्ता, पोलीस तपास सुरू

पुणेच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण-स्टेशन जवळून शक्ती खडके (वय २७) बेपत्ता. पोलीस तपास सुरू; फोटो, वर्णन आणि माहिती उपलब्ध.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन परिसरातून २७ वर्षीय शक्ती सुधाकर खडके हा तरुण बुधवारी सकाळपासून अचानक बेपत्ता झाला आहे. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोणालाही काही न सांगता तो घरातून निघून गेला आणि त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. या घटनेमुळे खडके कुटुंबीयांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची नोंद भिगवण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.

शक्ती खडके याचा वर्णनानुसार उंची ५ फूट ९ इंच असून बांधा सडपातळ आहे. त्याचा रंग गोरा असून डोक्याचे केस काळे आहेत. तो घरातून निळ्या रंगाचा जिन्स आणि नेव्ही ब्लू व लाल पट्ट्यांचा शर्ट परिधान करून बाहेर पडला होता. त्याच्या पायात चप्पल होत्या. तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलतो. त्याच्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून पोलीस हवालदार अन्सार शेख हे प्रकरण पाहत आहेत. पोलीस विविध ठिकाणी चौकशी करत असून स्थानिकांकडूनही माहिती घेतली जात आहे. शक्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

सध्या शक्ती खडके याबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. नागरिकांना जर त्याला कुठे पाहिले असल्यास किंवा त्याच्याबाबत काहीही माहिती असल्यास भिगवण पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागे कुठलीही वादावादी, घरगुती कारण की इतर कोणती परिस्थिती आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांतही चिंता पसरली आहे.

शक्ती खडके याला लवकरात लवकर शोधण्यात यावे आणि तो सुखरूप सापडावा, अशी अपेक्षा त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस याबाबत गांभीर्याने तपास करत असून लवकरच काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed