पुण्यातील नाईट लाईफ आणि ड्रग्ज पार्टींवर पोलिसांची कडक कारवाई

0
पुणे शहरातील नाईट लाईफ, पब आणि हायप्रोफाईल पार्ट्यांवर पोलिसांची जोरदार कारवाई सुरू

पुणे शहरातील नाईट लाईफ, पब आणि हायप्रोफाईल पार्ट्यांवर पोलिसांची जोरदार कारवाई सुरू

पुण्यातील पब, हायप्रोफाईल हाऊस पार्टी आणि ड्रग्ज पेडलरवर पोलिसांची मोठी कारवाई; अंमली पदार्थ रोखण्यासाठी मोहिमेस गती, तरुणाईच्या नशेच्या विळख्यावर लक्ष.

सायली मेमाणे

पुणे १ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील नाईट लाईफ, पब आणि हायप्रोफाईल पार्ट्यांवर पोलिसांची जोरदार कारवाई सुरू असून, अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर लगाम घालण्याचा प्रयत्न वेग घेऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील पब संस्कृती, घरगुती पार्ट्या आणि उच्चभ्रू तरुणाईमधील नशेचे वाढते प्रमाण पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. विशेषतः घरगुती हायप्रोफाईल पार्टीत ‘ड्रग पेडलर’ सहज प्रवेश मिळवून कोकेन, एमडी आणि इतर ड्रग्ज सहजपणे पोहोचवत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी अलीकडेच पब व लाउंजवर केलेल्या छाप्यांमध्ये अनेक प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले असून, काही ठिकाणी हायप्रोफाईल व्यक्तींचाही समावेश असलेल्या पार्टींमध्ये पोलिसांनी घातलेली धाड चर्चेचा विषय ठरली. पुणे पोलिसांनी अशा पार्टी आयोजकांबरोबरच ड्रग्ज विक्री करणाऱ्या पेडलर्सवर लक्ष केंद्रीत करत व्यसनमुक्तीसाठी जोरदार मोहिम हाती घेतली आहे.

आधी पबमध्ये ड्रग्जचा सुलभ वापर वाढला होता. त्यावर पोलिसांनी मोठी मोहीम राबवल्यानंतर घरात, फार्महाउसवर आणि हॉटेलमध्ये होणाऱ्या खासगी पार्टींना प्राधान्य दिले जाऊ लागले. या पार्टींमध्ये आमंत्रणाच्या माध्यमातून निवडक लोकांना बोलावले जाते आणि त्यातच ड्रग्ज पुरवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आता पबसोबतच घरगुती पार्टींवरही लक्ष केंद्रीत करत कारवाईचा जोर वाढवला आहे.

शहरातील तरुणाई, विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचारी, उच्चभ्रू कुटुंबातील मुले, सेलिब्रिटी मंडळी आणि कॉलेज युवक-युवती या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडकताना दिसत आहेत. यामुळे शहराचे सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या आरोग्य बिघडत चालले आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबत कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

नाईट लाईफच्या आड नशेचा छुपा व्यवहार आणि समाजातील विशिष्ट वर्गातील व्यक्तींची यामध्ये गुंतवणूक ही गंभीर बाब बनली असून, पुणे पोलिस अशा प्रत्येक व्यवहाराची बारकाईने चौकशी करत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed