भारतातील पहिले हृदय व मूत्रपिंडाचे एकत्रित प्रत्यारोपण डीपीयू हॉस्पिटलमध्ये यशस्वी

0
डीपीयू हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिले हृदय आणि मूत्रपिंड एकत्रित प्रत्यारोपण यशस्वी

डीपीयू हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिले हृदय आणि मूत्रपिंड एकत्रित प्रत्यारोपण यशस्वी

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी यांनी देशात प्रथमच एकाचवेळी हृदय व मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण यशस्वी केले. ही वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी!

पुणे ५ ऑगस्ट २०२५ : पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देशात पहिल्यांदाच एकाचवेळी हृदय आणि मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करून भारताच्या वैद्यकीय इतिहासात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ६० वर्षीय रुग्णावर ही गुंतागुंतीची आणि अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया १० जून २०२५ रोजी करण्यात आली. या रुग्णाला २००१ मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते, मात्र २०२४ मध्ये मूळ प्रत्यारोपित मूत्रपिंड निकामी झाले आणि त्याचवेळी डायलटेड कार्डिओमायोपथीमुळे हृदयाचे कार्यही पूर्णतः थांबले होते.

डायलिसिस व औषधांवर अवलंबून जीवन जगणाऱ्या या रुग्णाने अखेर डीपीयू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली. विविध विभागांतील तज्ज्ञांनी एकत्र येऊन रुग्णाची स्थिती विचारात घेत, एकाचवेळी हृदय आणि मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डीपीयूच्या ट्रान्सप्लांट युनिटच्या टीमने अत्यंत समन्वयाने आणि बारकाईने शस्त्रक्रिया केली. प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या शरीरात दोन्ही अवयवांची प्रतिकारशक्ती योग्यरीत्या नियंत्रित ठेवण्यासाठी अचूक औषधोपचार करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतरचा काळ अत्यंत नाजूक होता. वैद्यकीय पथकाने दररोज बैठकांचे आयोजन करून उपचारात बदल करत रुग्णाची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आज रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो डीपीयूच्या देखरेखीखाली हळूहळू बरा होत आहे. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी डीपीयू हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत ही कामगिरी वैद्यकीय प्राविण्याचे प्रतीक असल्याचे सांगितले.

प्र-कुलपती डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील यांनी हे यश केवळ वैद्यकीय उत्कृष्टतेचे नव्हे, तर मानवी मूल्यांचेही प्रतीक असल्याचे नमूद केले. डॉ. यशराज पाटील यांनी आधुनिक वैद्यकीय सेवा आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांमध्ये डीपीयू आघाडीवर असल्याचे सांगितले. अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कॉट यांनी या शस्त्रक्रियेतील अचूक निर्णय, समन्वय आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनामुळे हे यश मिळाल्याचे स्पष्ट केले. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि क्लिनिकल उत्कृष्टता यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य आहेत. आज या हॉस्पिटलने अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात एक नवीन मानदंड प्रस्थापित केला असून, देशभरातील इतर वैद्यकीय संस्थांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed