मुंबई : क्रिकेट प्रशिक्षकाकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, देवनार पोलिसांची तात्काळ कारवाई
मुंबईच्या गोवंडी परिसरात क्रिकेट प्रशिक्षक राजेंद्र पवारने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला.
मुंबईच्या गोवंडी परिसरात क्रिकेट प्रशिक्षक राजेंद्र पवारने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर क्रिकेट प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून देवनार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी राजेंद्र पवारला अटक केली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
आरोपी राजेंद्र पवार हा गोवंडी परिसरात राहणारा असून तो क्रिकेट प्रशिक्षण देण्याचं काम करतो. पीडित मुलगी देखील त्याच्याकडे प्रशिक्षण घेत होती. प्रशिक्षणाच्या बहाण्याने त्याने तिला एकांतात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसात धाव घेतली.
देवनार पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांची पार्श्वभूमी तपासणं किती गरजेचं आहे, हे या घटनेतून स्पष्ट होतं. मुंबई पोलिसांनी पालकांना सावध राहण्याचं आणि मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे.