बांधवगड व्याघ्र प्रकल्पात इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटरची पायाभरणी

बांधवगड व्याघ्र प्रकल्पात इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटरची पायाभरणी
मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटरची पायाभरणी करण्यात आली. पुनीत बालन समूहाकडून १,१०० कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा आणि वन्यजीव गस्तीसाठी तीन वाहनांचे सहकार्य.
पुणे, १६ नोव्हेंबर २०२६ : मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाच्या तळा परिसरात श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटरची पायाभरणी करण्यात आली. पुनीत बालन समूहाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून पर्यटकांना वन्यजीव, जंगल आणि निसर्ग संवर्धनाविषयी माहिती मिळणार आहे. यासोबतच समूहाकडून व्याघ्र प्रकल्पात आणि परिसरात काम करणाऱ्या सुमारे १,१०० व्यक्तींसाठी जीवन विम्याचे संरक्षण दिले जात आहे. वन्यजीव गस्त आणि संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तीन वाहने उपलब्ध करून देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

या पायाभरणी समारंभाला आमदार मीना सिंह, पुनीत बालन समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरिचच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जान्हवी धारिवाल-बालन तसेच शोभा धारिवाल उपस्थित होत्या. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बी. एस. अन्निगेरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (विकास), बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. अनुपम सहाय आणि उपसंचालक योहान कटारा यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. याशिवाय प्रकल्पाचे सहाय्यक संचालक, तळा परिक्षेत्राचे वन अधिकारी, वन कर्मचारी तसेच रिसॉर्ट, गाईड आणि जिप्सी संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
पुनीत बालन समूहाकडून बांधवगड व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात काम करणाऱ्या सुमारे १,१०० व्यक्तींसाठी जीवन विम्याचा वार्षिक हप्ता भरला जातो. यामध्ये वन कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, गाईड, जिप्सी संघटनेचे सदस्य आणि वाहनचालकांचा समावेश आहे. या विम्यासाठी समूहाकडून दरवर्षी सुमारे ३४ लाख रुपयांचा प्रीमियम भरला जातो. पुढील दहा वर्षांसाठीही विम्याचे हप्ते भरण्याची जबाबदारी समूहाने स्वीकारली आहे. या उपक्रमामुळे जंगल आणि वन्यजीव संरक्षणाच्या कामात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत जबाबदारी पार पाडावी लागते. अशा वेळी त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. विमा संरक्षणामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होऊ शकते.
बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील गस्त व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुनीत बालन यांच्याकडून तीन इसुझू वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ती प्रकल्प व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्याचे नियोजन आहे. या वाहनांमुळे वन विभागाच्या गस्त पथकांना जंगल परिसरात नियमित देखरेख आणि वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कामे अधिक प्रभावीपणे करता येतील.
या उपक्रमाबाबत बोलताना पुनीत बालन यांनी वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सातत्याने काम करणारे वन व सुरक्षा कर्मचारी हे संवर्धन प्रक्रियेचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यांच्या कामात सुरक्षितता वाढवणे, कुटुंबांना आर्थिक संरक्षण देणे आणि वन्यजीव संरक्षण व्यवस्था मजबूत करणे यासाठी समूह प्रयत्नशील राहील, असे त्यांनी नमूद केले.
बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. अनुपम सहाय यांनीही या सहकार्याचे स्वागत केले. वन आणि सुरक्षा कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही नैसर्गिक संसाधने व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा आणि गस्तीसाठी वाहनांची उपलब्धता यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
पुनीत बालन समूह २०२१ पासून बांधवगड व्याघ्र प्रकल्पासोबत वन कर्मचारी कल्याण आणि वन्यजीव संरक्षणाशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी आहे. नव्या इंटरप्रिटेशन सेंटरची उभारणी, जीवन विमा आणि गस्तीसाठी वाहनांचे सहकार्य या माध्यमातून या भागातील संव
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare