31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 2025 : 10 ऑगस्टला 25 हजार धावपटूंना थरार
31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 2025 : 10 ऑगस्टला 25 हजार धावपटूंना थरार
31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार असून, ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली 25 हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे.
सायली मेमाणे
पुणे ७ ऑगस्ट २०२५ : 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 2025 रोजी 10 ऑगस्टला होणार असून ठाणेकरांसह राज्यभरातील धावपटूंमध्ये या स्पर्धेची मोठी उत्सुकता आहे. ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी महानगरपालिकेने जोरदार तयारी केली आहे.
यंदाही 21 किलोमीटर पुरुष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किलोमीटर स्पर्धेसाठी टाईम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये फिटनेस आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याचा हेतू असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटू यामध्ये सहभागी होणार आहेत.
ठाणे शहरात वर्षा मॅरेथॉन एक खास परंपरा बनली असून, यामध्ये 25 हजारहून अधिक धावपटू सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून, धावपटूंसाठी विविध वयोगटांनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये फिटनेस प्रेमींसाठी एक मोठा उत्सव ठरतो आहे.
शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या वर्षी मॅरेथॉनच्या मार्गावर स्वच्छता, आरोग्य सुविधा, जलपान केंद्रे आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्पर्धेसाठी विविध वयोगटांतील सहभागींसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. ठाणेकरांमध्ये वर्षा मॅरेथॉनसाठी सध्या मोठी उत्सुकता असून, शहरातील वातावरण आता हळूहळू स्पर्धेच्या रंगात रंगू लागले आहे.