सारा तेंडुलकरने मुंबईत सुरू केली ‘Pilates Academy × Sara Tendulkar’, फिटनेस जगतात नवा अध्याय

0
सारा तेंडुलकरने मुंबईत सुरू केली ‘Pilates Academy × Sara Tendulkar’, फिटनेस जगतात नवा अध्याय

सारा तेंडुलकरने मुंबईत सुरू केली ‘Pilates Academy × Sara Tendulkar’, फिटनेस जगतात नवा अध्याय

क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने मुंबईतील अंधेरी येथे ‘Pilates Academy × Sara Tendulkar’ ची सुरुवात केली आहे. दुबईतील लोकप्रिय पिलेट्स फ्रँचायझीची ही चौथी भारतीय शाखा असून, फिटनेस आणि वेलनेस प्रेमींसाठी नवा अनुभव देणार आहे.

सायली मेमाणे

पुणे १६ ऑगस्ट २०२५ : क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या कन्या सारा तेंडुलकरने स्वतःच्या व्यावसायिक क्षेत्रात नवा टप्पा गाठला आहे. सारा तेंडुलकरने मुंबईतील अंधेरी येथे ‘Pilates Academy × Sara Tendulkar’ या नावाने फिटनेस आणि वेलनेस स्टुडिओची सुरुवात केली आहे. दुबईमध्ये लोकप्रिय असलेल्या या पिलेट्स फ्रँचायझीची भारतातील चौथी शाखा असून, या उद्घाटनामुळे फिटनेस जगतात मोठी चर्चा रंगली आहे.

सचिन आणि अंजली तेंडुलकर यांच्या उपस्थितीत या अकादमीचे उद्घाटन झाले. त्याचबरोबर अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याशी संबंधित बातम्यांमुळे तेंडुलकर कुटुंब सध्या चर्चेत आहे. त्यामुळे साराने सुरू केलेल्या या नव्या उपक्रमाकडे अधिकच लक्ष वेधले गेले आहे. फिटनेस, आरोग्य आणि वेलनेस या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी आकर्षित होत आहे. अशा परिस्थितीत साराने सुरु केलेला हा व्यवसाय भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

या स्टुडिओमध्ये पिलेट्सच्या आधुनिक तंत्रांचा वापर करून विविध प्रकारचे वर्ग आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये Mat Pilates, Reformer Pilates यांसारख्या आंतरराष्ट्रीय पद्धतींचा समावेश आहे. शरीरातील कोर स्ट्रेंथ वाढवणे, लवचिकता वाढवणे, योग्य पोस्चर ठेवणे, श्वासोच्छ्वासाची योग्य पद्धत आणि बॉडी अलाइनमेंट यावर या अकादमीचा विशेष भर आहे. फिटनेस क्षेत्रात पिलेट्स ही पद्धत जगभरात लोकप्रिय झाली आहे आणि आता मुंबईत साराच्या माध्यमातून त्याला नवे व्यासपीठ मिळाले आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असून एक ओळखलेली न्यूट्रिशनिस्ट आहे. तसेच ती सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालिका (Director) देखील आहे. त्यामुळे तिचे काम केवळ फिटनेस स्टुडिओ चालवण्यापुरते मर्यादित नाही, तर समाजाभिमुख उपक्रमात देखील ती पुढाकार घेते. या पिलेट्स अकादमीबद्दल बोलताना साराने सांगितले की हा स्टुडिओ केवळ फिटनेस देणारा केंद्र नसेल, तर काळजी, उत्कटता आणि सकारात्मकतेने भरलेला एक समुदाय तयार करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे हा स्टुडिओ वेलनेस आणि एकात्मिक आरोग्याचा अनुभव देणारे ठिकाण ठरणार आहे.

मुंबईसारख्या महानगरात जिथे ताणतणाव, धकाधकीचे जीवन आणि व्यस्त दिनक्रम आहे, तिथे पिलेट्ससारखी पद्धत शरीर आणि मन दोन्हीला संतुलित ठेवण्यास मदत करते. सारा तेंडुलकरने या गरजेची जाणीव ठेवून पिलेट्स अकादमी सुरु केली असून, यातून आरोग्य आणि फिटनेस क्षेत्राला नवा आयाम मिळणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, चाहत्यांकडून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजाचा वारसा जपत, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने सारा तेंडुलकरने घेतलेली ही पावले महत्त्वाची मानली जात आहेत. तिच्या या नव्या उपक्रमामुळे अनेक तरुण उद्योजक आणि फिटनेस प्रेमींना प्रेरणा मिळणार असून, वेलनेस क्षेत्रात नवीन उंची गाठण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed