‘मोदक महोत्सव 2025’: मुंबई महापालिकेची घरपोच मोदक सेवा, बुकींग फुल होण्याआधी नोंदवा

0
Modak Mahotsav 2025: मुंबई महापालिकेची घरपोच मोदक सेवा, बुकींग फुल होण्याआधी नोंदवा

Modak Mahotsav 2025: मुंबई महापालिकेची घरपोच मोदक सेवा, बुकींग फुल होण्याआधी नोंदवा

गणेशोत्सवासाठी ‘मोदक महोत्सव 2025’! मुंबई महापालिकेच्या महिला बचत गटांकडून पारंपारिक उकडीचे आणि तळलेले मोदक घरपोच मिळवा. ऑर्डर 21-25 ऑगस्ट 2025.

सायली मेमाणे

पुणे २१ ऑगस्ट २०२५ : मुंबई: गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारीत, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) संलग्न महिला बचत गटांनी ‘मोदक महोत्सव 2025’ चे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा उद्देश महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणे आणि मुंबईकरांना अस्सल चवीचे मोदक घरपोच उपलब्ध करून देणे आहे.

महिला बचत गटांनी तयार केलेले पारंपारिक उकडीचे तसेच तळलेले मोदक यंदा घरपोच उपलब्ध होणार आहेत. मुंबई महापालिकेने महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. ‘मोदक महोत्सव 2025’ हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यामुळे महिलांना त्यांच्या पाककौशल्याचा उपयोग करून व्यवसाय करण्याची संधी मिळत आहे.

मोदकासाठी ऑर्डर कशी नोंदवावी:
मुंबईकरांना मोदक मागवण्यासाठी 21 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत https://shgeshop.com या वेबसाइटवर ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहेत. या घरपोच डिलिव्हरीसाठी कोणतेही डिलिव्हरी शुल्क नाही. मोदकांची होम डिलिव्हरी 27 ऑगस्ट 2025 रोजी केली जाणार आहे, जेणेकरून गणरायाच्या आगमनापूर्वी मोदक मिळतील.

पारंपरिक मोदक बनविणे ही कला असून, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना उकडीचे मोदक बनवणे शक्य नसते. महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक घरपोच उपलब्ध झाल्यामुळे गणेशोत्सवाचा पारंपरिक गोडवा टिकून राहणार आहे.

मुंबई महापालिकेचा हा उपक्रम समाजाला एकत्र आणणारा तसेच महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणारा प्रयत्न ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed