भटक्या कुत्र्यांबाबत Supreme Court चा मोठा निर्णय | शेल्टर आदेशाला स्थगिती
भटक्या कुत्र्यांबाबत Supreme Court चा मोठा निर्णय | शेल्टर आदेशाला स्थगिती
Supreme Court ने भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शेल्टरमध्ये ठेवण्याच्या आदेशाला स्थगिती देत, नसबंदी व लसीकरण अनिवार्य केले आहे. सार्वजनिक ठिकाणी अन्न देण्यास बंदी.
सायली मेमाणे
पुणे २२ ऑगस्ट २०२५ : नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याच्या आदेशाला स्थगिती देत न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या कुत्र्यांना नसबंदी (sterilization) व लसीकरण (vaccination) करून पुन्हा त्याच क्षेत्रात सोडले जाईल. मात्र, सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यावर बंदी घालण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- भटक्या कुत्र्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याऐवजी लसीकरण व नसबंदी अनिवार्य
- त्याच क्षेत्रात सोडण्याचे निर्देश
- सार्वजनिक ठिकाणी अन्न देण्यास बंदी, स्वतंत्र सोय आवश्यक
- कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना ₹25,000 ते ₹2,00,000 दंड
- प्राणीप्रेमींना कुत्रे दत्तक घेण्यासाठी एमसीडीकडे अर्ज करता येणार
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय फक्त एका शहरापुरता मर्यादित नसून देशभरात (Pan India) लागू होणार आहे. त्यामुळे महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था यांना यासंदर्भात कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे.
प्राणीप्रेमींसाठी न्यायालयाने एक महत्त्वाचा पर्याय दिला आहे. इच्छुकांनी थेट एमसीडीकडे अर्ज करून भटक्या कुत्र्यांना दत्तक घेता येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.