नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना : ठाकरे गटाचा भाजपा-शिंदे गटावर पक्षपातीपणाचा आरोप

0
नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप

नवी मुंबई पालिकेच्या प्रभाग रचनेवर ठाकरे गटाचा आक्षेप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप प्रभागरचनेवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही रचना केल्याचा आरोप करीत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भूमिका स्पष्ट केली.

सायली मेमाणे

पुणे २५ ऑगस्ट २०२५ : नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने शुक्रवारी रात्री प्रारुप प्रभागरचना जाहीर केली आहे. या नव्या आराखड्यानुसार शहरात २८ प्रभाग तर १११ नगरसेवक असणार आहेत. ही रचना न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी करण्यात आली आहे.

पालिकेने सांगितले आहे की, या प्रारुप रचनेवर नागरिक आणि राजकीय पक्षांकडून हरकती व सूचना ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्वीकारल्या जातील. त्यानंतर अंतिम प्रभागरचना निश्चित करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही रचना जाहीर होताच ठाकरे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला. ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “भाजपा आणि शिंदे गटाच्या दबावाखालीच ही प्रभाग रचना केली गेली आहे. काही भागांमध्ये मतदारसंघांची फेरफार करून सत्ताधारी गटांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.”

भगवान यांनी पुढे सांगितले की, ठाकरे गट लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार अर्ज सादर करून या प्रभाग रचनेबाबत आपली भूमिका मांडणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच या प्रारुप रचनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप-शिंदे गटाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ठाकरे गटाच्या आरोपामुळे आगामी निवडणुकीत वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, प्रभाग रचना ही स्थानिक निवडणुकीत अतिशय महत्त्वाची ठरते. प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या आणि भौगोलिक विभागणी यावर पक्षाचे उमेदवार निश्चित केले जातात. त्यामुळे या प्रभाग रचनेतील बदलांचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग रचना वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ठाकरे गटाचे आरोप आणि प्रशासनाची भूमिका यामुळे पुढील काही दिवसांत या निवडणुकीची रंगत आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed