केरळमध्ये IT कर्मचारी अपहरण प्रकरण; लक्ष्मी मेननवर FIR, फरार झाली अभिनेत्री

0
केरळमध्ये IT कर्मचारी अपहरण प्रकरण; लक्ष्मी मेननवर FIR, फरार झाली अभिनेत्री

केरळमध्ये IT कर्मचारी अपहरण प्रकरण; लक्ष्मी मेननवर FIR, फरार झाली अभिनेत्री

केरळमधील एर्नाकुलम नॉर्थमध्ये IT कर्मचाऱ्यावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप; FIR अभिनेत्री लक्ष्मी मेनन विरुद्ध दाखल, पोलीस सध्या चौकशी करत असून अभिनेत्री फरार आहे.

सायली मेमाणे

पुणे २८ ऑगस्ट २०२५ : केरळच्या एर्नाकुलम नॉर्थमध्ये एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. येथील प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मेननवर IT कर्मचारी अपहरण आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. अलुवा येथील रहिवासी अलियार शाह सलीम या कर्मचाऱ्याने अभिनेत्री विरोधात FIR दाखल केली असून, सध्या लक्ष्मी मेनन फरार आहे.

माहितीनुसार, ही घटना एका बारमध्ये सुरु झालेल्या वादातून सुरु झाली. अलियारने तक्रारीत सांगितले की, तो शहरातील एका बारमध्ये होता. लक्ष्मी मेनन, मिथुन, अनीश आणि आणखी एक महिला मित्र तिथे उपस्थित होते. अलियारने आरोप केला की, लक्ष्मी मेनन आणि तिचे मित्र नशेत होते आणि त्यांनी IT कर्मचाऱ्यासोबत भांडण केले.

बारमधून निघाल्यानंतर लक्ष्मी मेननने मित्रासोबत मिळून IT कर्मचाऱ्याच्या गाडीचा पाठलाग केला. FIR नुसार, रात्री जवळपास 11.45 वाजता नॉर्थ रेल्वे स्थानकाजवळ अभिनेत्री आणि तिच्या मित्रांनी कर्मचाऱ्याची गाडी थांबवली, त्याला गाडीतून बाहेर काढले आणि स्वतःच्या कारमध्ये घातले. त्यानंतर IT कर्मचाऱ्यावर मारहाण झाली आणि त्याला धमकी देत अलुवा-पराउर जंक्शनपर्यंत पळवून नेण्यात आले. सीटीटीव्ही फुटेजने ही घटना समोर आली असून, पोलीस सध्या तपास करत आहेत.

लक्ष्मी मेननचा सहभाग असल्यामुळे हा प्रकरण हायप्रोफाइल बनले आहे. पोलीस तिला शोधत आहेत आणि FIR नुसार तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश आहेत.

लक्ष्मी मेनन केरळच्या त्रिपुनितुरा येथील रहिवासी असून, तिने 2011 मध्ये दिग्दर्शक विनयन यांच्या ‘राघविनाते स्वंथम रझिया’ या सिनेमातून मल्याळम सिनेमात पदार्पण केले. तिने ‘सुंदरपांडियन’, ‘कुट्टी पुली’, ‘जिगर्थंडा’, ‘मिरुथन’ यांसारख्या मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

या प्रकरणामुळे केरळमधील सिनेविश्व आणि स्थानिक पोलिस प्रशासन दोन्ही सध्या या घटनेवर लक्ष केंद्रित करत आहेत. FIR नुसार, IT कर्मचाऱ्याचे संरक्षण आणि तपास यासाठी पोलीस विशेष उपाययोजना करत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *