नागपूर पोलिसांचा ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
नागपूर पोलिसांचा ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर पोलिसांचा ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेत 50 लाखांचा एम.डी. ड्रग्ज जप्त, चार आरोपींना अटक, महिला पेडलरचे नाव चौकशीत समोर आले.

सायली मेमाणे

पुणे २० सप्टेंबर २०२५ :नागपूरमध्ये ड्रग्ज माफियांसाठी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत कळमना पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी धडक कारवाई करत तब्बल 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ड्रग्ज माफियांच्या चौकडीतील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका महिला पेडलरचे नाव चौकशीत समोर आले आहे.

16 सप्टेंबरच्या मध्यरात्री मिनीमाता नगर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान लाल रंगाच्या एम.जी. झेड.एस. ईव्ही कारमध्ये दोन संशयित व्यक्ती फिरताना पोलिसांच्या लक्षात आले. त्यांची कार थांबवून तपासणी केली असता, डॅशबोर्डमधून 5.030 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज सापडले. तसेच कार आणि मोबाईलसह तब्बल 15.75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक केलेल्या आरोपी अमित शर्मा आणि मुकेश तराळे यांची चौकशी केली असता त्यांनी या एम.डी. खेप आयुष इंगोले याच्याकडून मिळाल्याचे कबूल केले. आयुष इंगोलेच्या घरावर छापा टाकल्यावर 219 ग्रॅम एम.डी. ड्रग्ज सापडली, ज्याची किंमत अंदाजे 33 लाख रुपये होती. यापुढे तपासात आयुषने हा ड्रग्ज मयुर ठवकरकडून घेतल्याचे कबूल केले, ज्यालाही पोलिसांनी गंगाबाई घाट परिसरातून ताब्यात घेतले.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 50 लाखांचा ड्रग्ज मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान एका महिला पेडलरचे नावही चौकशीत समोर आले असून पुढील तपास सुरू आहे.

‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत कळमना पोलिसांची ही कारवाई नागपूरमधील अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील मोठे यश मानले जात आहे. पोलिसांनी या कारवाईत ड्रग्ज नेटवर्कची माहिती मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच रणनीती आखली होती. या मोहिमेचा उद्देश शहरातील ड्रग्ज माफिया आणि त्यांचे पुरवठादार यांच्यावर निर्णायक कारवाई करणे आहे.

पोलिसांनी सांगितले की, नागपूरमध्ये ड्रग्जच्या वितरणावर आक्रमक कारवाई सुरु आहे आणि शहरात युवकांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचू नयेत यासाठी नियमित पेट्रोलिंग आणि तपास सुरू आहे. कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल आणि पकडलेले आरोपी भविष्यातील ड्रग्ज पुरवठ्याच्या नेटवर्कचे महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामुळे पुढील तपासात अधिक आरोपींच्या चौकशीस मदत होईल.

नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून, प्रशासनाला शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रचलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. पुढील कारवाईत महिला पेडलरच्या नेटवर्कचा शोध घेऊन या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यात येईल, ज्यामुळे शहरातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेला बळकटी मिळेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed