महाराष्ट्र सरकार देणार यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपणासह 9 गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत

0
महाराष्ट्र सरकार देणार यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपणासह 9 गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत

महाराष्ट्र सरकार देणार यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपणासह 9 गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने राज्य आरोग्य योजनेतून यकृत, फुफ्फुस, हृदय व अस्थिमज्जा प्रत्यारोपणासह 9 गंभीर आजारांवर मोठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. 5 लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या उपचारांसाठी राखीव निधी वापरला जाईल.

सायली मेमाणे

पुणे २५ सप्टेंबर २०२५ : मुंबई – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्य आरोग्य योजनेतील राखीव निधी आता पाच लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येणाऱ्या नऊ गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे महागड्या उपचारांसाठी रुग्णांना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

मंत्रिमंडळाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रकमेचा विनियोग राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी व शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी करण्यास मंजुरी दिली आहे. या निधीतून गरजू रुग्णांसाठी महागडे उपचार, जसे की यकृत, फुफ्फुस, हृदय व अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जातील.

राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या निधीच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केली आहे. आता राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून मिळणाऱ्या निधीपैकी 20 टक्के राखीव निधीसाठी ठेवले जातील, तर उर्वरित 80 टक्के निधी संबंधित रुग्णालयांना दिला जाईल. रुग्णालयांनी या 80 टक्क्यातून 19 टक्के पायाभूत सुविधा उभारण्यासाठी, 40 टक्के किरकोळ सामग्री व औषधांसाठी, 20 टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी आणि 1 टक्के कार्यक्रम माहिती व प्रचारसाठी वापरता येईल.

सदर निधीतून कोणत्या उपचारांसाठी किती खर्च होणार आहे, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी 15 लाख, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी 20 लाख, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी 20 लाख, यकृत प्रत्यारोपणासाठी 22 लाख रुपये खर्च करता येणार आहे. तसेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक) 9.5 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अनरिलेटेड) 17 लाख, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (हॅप्ली) 17 लाख, ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) 10 लाख आणि ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (TMVR) 10 लाख रुपये प्रती रुग्ण खर्च करता येतील.

शिवाय, मंत्रिमंडळाने या उपचारांमध्ये सहभागी डॉक्टर्स आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्यात सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. तसेच शस्त्रक्रियेचे दर, निधीचा वापर आणि रुग्णालयांना बळकट करण्यासाठी उपाययोजना यावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल आणि महागड्या उपचारांसाठी सक्षम रुग्णालयांना पुरेसा निधी मिळेल. सरकारच्या या पावल्यामुळे गंभीर आजारांमध्ये जीवनरक्षक उपचारांसाठी संधी वाढणार असून, आरोग्य व्यवस्थेचा दर्जाही सुधारला जाईल. भविष्यातील रुग्णांना आर्थिक अडचणीशिवाय उपचार मिळण्यास ही योजनेचा मोठा लाभ होईल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *