वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या चिमुकल्या बाळाचा ताबा अखेर आईकडे; बाल कल्याण समितीचा भावनिक निर्णय

1
चिमुकल्या बाळाचा ताबा अखेर आईकडे

चिमुकल्या बाळाचा ताबा अखेर आईकडे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या ९ महिन्यांच्या बाळाचा ताबा बाल कल्याण समितीने तिच्या आईकडे दिला. समाजातील भावनांचा आदर राखत समितीने भावनिक निर्णय घेतला.
सायली मेमाणे,

पुणे : ३१ मे २०२५ : वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या हृदयद्रावक प्रकरणात तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाच्या ताब्याबाबत अखेर पुणे जिल्हा बाल कल्याण समितीने निर्णय घेतला आहे. आईविना पोरक्या झालेल्या जनक हगवणेचं संगोपन कोण करणार, या प्रश्नावर समाजात मोठी चर्चा सुरू होती.

या भावनिक प्रकरणाची सामाजिक पार्श्वभूमी आणि तणावपूर्ण कुटुंबस्थिती लक्षात घेता, समितीने जनकच्या आजी आणि वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना ‘योग्य व्यक्ती’ (Fit Person) म्हणून अधिकृतपणे जबाबदारी दिली आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवर ही माहिती देताना सांगितले की, जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालात श्रीमती कस्पटे यांचं कौटुंबिक, भावनिक आणि सामाजिक वातावरण बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

या निर्णयानुसार, पुढे जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती कस्पटे यांच्याकडे असेल. त्याच्या शिक्षणापासून आरोग्य आणि इतर गरजांची पूर्ण जबाबदारीही त्या स्वीकारणार आहेत.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर सहा दिवस जनक हा सासरच्या घरी होता. या काळात त्याच्या संगोपनात अडचणी निर्माण झाल्या होत्या, अशी माहिती पुढे आली होती. अखेर २२ मे रोजी कस्पटे कुटुंबाला बाळ परत मिळालं आणि त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

बाल कल्याण समितीच्या या निर्णयाने समाजातील जनभावना आणि न्यायाचा समतोल राखला आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाचं मोठं स्वागत होत असून, हगवणे कुटुंबाकडे बाळाचा ताबा न देण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

1 thought on “वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या चिमुकल्या बाळाचा ताबा अखेर आईकडे; बाल कल्याण समितीचा भावनिक निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed