‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण; मराठी सिनेमासाठी नवा डिजिटल अड्डा
‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण; मराठी सिनेमासाठी नवा डिजिटल अड्डा
‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच; मराठी चित्रपट, वेबसिरीज, नॉन-फिक्शन शो आणि आंतरराष्ट्रीय डब कंटेंटसह मनोरंजनाची मेजवानी फ्री उपलब्ध. मराठी भाषेसाठी नवा डिजिटल मंच.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑक्टोबर २०२५ : ‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या नव्या डिजिटल ॲपमुळे मराठी भाषा आणि संस्कृतीला बळकटी मिळेल, असा उद्देश यामागे आहे. अभिजात मराठी वर प्रेक्षकांना मराठी चित्रपट, वेबसिरीज, नॉन-फिक्शन शो, तसेच आंतरराष्ट्रीय डब कंटेंटचा अनुभव घेता येणार आहे.
हा ॲप पूर्णपणे फ्री असून कोणत्याही व्यक्तीला सहज डाउनलोड करता येईल. यामुळे मराठी भाषिक प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कंटेंटचा आस्वाद घ्यायला आता डिजिटल अड्डा उपलब्ध झाला आहे. येत्या ९ तारखेपासून या ॲपवर चित्रपटांची मालिका पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या काळात अनेक मराठी चित्रपटांना प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर कमी प्राधान्य दिलं जात असल्याची तक्रार कायम राहते. ‘अभिजात मराठी’ या प्लॅटफॉर्मने या समस्येवर सशक्त उत्तर दिले आहे. कलाकार, निर्माते आणि प्रेक्षक या सर्वांसाठी हा एक मोठा प्लस पॉइंट ठरणार आहे.
ओटीटी मार्केटमध्ये मराठी भाषिक प्रेक्षकांची संख्या वाढत असल्याने, ‘अभिजात मराठी’ हा नवीन डिजिटल मंच मराठी सिनेमासाठी क्रांतिकारी बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांना उच्च दर्जाचे कंटेंट आणि सहज पोहच सुनिश्चित करणारा हा ॲप मराठी मनोरंजन क्षेत्राला पुढे नेईल.
संपूर्ण मराठी मनोरंजनाची विविधता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम मराठी भाषेसाठी एक सकारात्मक उदाहरण आहे. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांचा अनुभव घेण्यास आणि मराठी सिनेमाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आहे.