Adani Group: पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला; कोर्टाची नोटीस

0
पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला; कोर्टाची नोटीस

पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला; कोर्टाची नोटीस

अदाणी ग्रुपने पत्रकार अभिसार शर्मा आणि ब्लॉगर राजू परुळेकर यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. गांधीनगर दंडाधिकारी न्यायालयाने 20 सप्टेंबरला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पत्रकारांनी खोटे आरोप करून कंपनीची प्रतिमा मलिन केल्याचा दावा अदाणी ग्रुपने केला आहे.

सायली मेमाणे

मुंबई १७ सप्टेंबर २०२५ :
प्रसिद्ध उद्योगसमूह अदाणी ग्रुपने पत्रकार अभिसार शर्मा आणि ब्लॉगर राजू परुळेकर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. गांधीनगर येथील दंडाधिकारी न्यायालयाने दोघांनाही 20 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

अदाणी ग्रुपने आरोप केला आहे की, या पत्रकारांनी हेतुपुरस्सर खोटी व बदनामी करणारी विधाने करून कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

अदाणी ग्रुपचे वकील संजय ठक्कर यांनी सांगितले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 223 नुसार ही नोटीस धाडण्यात आली आहे. त्यामुळे शर्मा आणि परुळेकर यांनी प्रत्यक्ष किंवा वकिलामार्फत न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.

तक्रारीनुसार, अभिसार शर्मा यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी आसाममधील जमिनीवरून अदाणी समुहाविरोधात यूट्यूबवर विधाने केली होती, तर राजू परुळेकर यांनी जानेवारी 2025 पासून ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरून अदाणी ग्रुपविरोधात पोस्ट्स केल्या होत्या.

तसेच, या पत्रकारांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल अदाणी ग्रुपवर आरोप केले होते. मात्र, अदाणी समुहाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचा त्यांच्या कंपनीशी काहीही संबंध नाही आणि संबंधित महाबळ सिमेंट प्रा. लि. या कंपनीचा देखील अदाणी ग्रुपशी कोणताही संबंध नाही.

कोर्टात पुरावा म्हणून शर्मा यांचा व्हिडिओ, परुळेकर यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचा आदेश सादर करण्यात आला आहे. आरोप सिद्ध झाल्यास दोघांनाही 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *