Amit Thackeray: ‘दुबार मतदार दिसले तर बुथवरच फटकवणार’; मतदान दिवशीचा मनसेचा सिक्रेट प्लॅन उघड

0
Amit Thackeray: ‘दुबार मतदार दिसले तर बुथवरच फटकवणार’; मतदान दिवशीचा मनसेचा सिक्रेट प्लॅन उघड

Amit Thackeray: ‘दुबार मतदार दिसले तर बुथवरच फटकवणार’; मतदान दिवशीचा मनसेचा सिक्रेट प्लॅन उघड


मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत मतदान दिवशीचा सिक्रेट प्लॅन सांगितला. दुबार आणि बोगस मतदारांवर कठोर भूमिका, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आणि उत्तर भारतीय मतांवरही त्यांनी भाष्य केले.

पुणे १० जानेवारी २०२६ : मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र आल्याने निर्माण झालेला माहोल स्पष्टपणे जाणवत असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. अमित ठाकरे यांनी महापालिका निवडणूक, मतदान प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, भाजपवर आरोप आणि मनसेची आगामी रणनिती यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी मतदान दिवशी मनसेचा ‘सिक्रेट प्लॅन’ उघड करत वादग्रस्त विधान केले आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे संपूर्ण मराठी समाजात आनंदाचे वातावरण आहे आणि मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर एकजूट दिसून येत आहे. सध्या निवडणुका पैशाच्या जोरावर लढवल्या जात असून उमेदवार विकत घेणे, दबाव टाकणे आणि धमकावणे अशा प्रकारांमुळे सामान्य जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. हाच राग आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दिसून येईल, असा दावा त्यांनी केला.

यावेळी अमित ठाकरे यांनी दुबार आणि बोगस मतदारांचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव झाल्यानंतर विधानसभेत तो टाळण्यासाठी सुमारे 40 लाख दुबार मतदार राज्यात आणल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याच दुबार मतदारांचा फायदा भाजपला विधानसभेत झाला, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र आता महापालिका निवडणुकीत हा प्रकार चालणार नाही, असे स्पष्ट करत मनसेची संपूर्ण यंत्रणा या विषयावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित ठाकरे यांनी सांगितले की, दुबार आणि बोगस मतदारांची संपूर्ण माहिती मनसेकडे उपलब्ध आहे. मतदान दिवशी जर कोणी दुबार किंवा बोगस मतदार बुथवर दिसला, तर त्याला तिथेच फटकवले जाईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. हे लोक दुसऱ्या राज्यातून येऊन इथे मतदान करतात आणि अनधिकृत प्रकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व बाबींचे पुरावे निवडणूक आयोगाकडे देण्यात आले होते, मात्र आयोगाने त्याची दखल न घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आपण आता स्वतःच अलर्ट राहणार असल्याचे सांगत अमित ठाकरे म्हणाले की, दोन-तीन जणांना चोप मिळाल्याचे समजल्यावर इतर दुबार आणि बोगस मतदार घराबाहेरच पडणार नाहीत. त्यामुळे हा प्रकार थांबवता येईल, असा त्यांचा दावा आहे. जो नडेल त्याला फोडणार, असे विधान करत त्यांनी मराठी माणसाच्या सन्मानाचा मुद्दाही अधोरेखित केला.

उत्तर भारतीयांची मते मनसेला मिळणार का, या प्रश्नावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, मराठीचा सन्मान करणारा कोणीही असो, तो आपलाच आहे. मराठी शिकण्याची तयारी, भाषेचा आदर आणि स्थानिक संस्कृतीचा सन्मान केला, तर कोणालाही विरोध नाही. मात्र मराठीचा अपमान आणि अरेरावी सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या मुलाखतीमुळे अमित ठाकरे यांची भूमिका आणि मनसेची आगामी निवडणूक रणनिती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *