Baramati Accident: फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी; अडीच वर्षांचा संसार उद्ध्वस्त

0
Baramati Accident: फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी; अडीच वर्षांचा संसार उद्ध्वस्त

Baramati Accident: फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी; अडीच वर्षांचा संसार उद्ध्वस्त

बारामती विमान अपघातातील फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचे पार्थिव वरळी येथील निवासस्थानी दाखल. 29 वर्षीय पिंकी माळींच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

पुणे २८ जानेवारी २०२६ : बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या दुर्घटनेतील प्रत्येक मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा आहे. या अपघातात फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर तब्बल 24 तासांनी त्यांचे पार्थिव मुंबईतील वरळी येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पिंकी माळी यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आणि आप्तस्वकीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेले Learjet 45 हे खासगी विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीजवळ कोसळले. या भीषण अपघातात विमानाला आग लागली आणि काही क्षणांतच तीन स्फोट झाल्याची माहिती समोर आली. या आगीत विमानातील सर्व पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.

फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या केवळ 29 वर्षांच्या होत्या. अवघ्या अडीच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. संसार नव्याने सुरू असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातानंतर 24 तासांनी त्यांचे पार्थिव सासरी आणण्यात आले, तेव्हा वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. पती सोमकर यांनी पत्नीच्या पार्थिवाचे दर्शन घेताच अश्रू अनावर झाले. घरातील प्रत्येक सदस्याचा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता.

पिंकी माळी या मागील सहा वर्षांपासून विमानसेवेत कार्यरत होत्या. त्यांनी विविध विमानांमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम केले होते. अनेक व्हीआयपी प्रवाशांसोबत त्यांनी प्रवास केला असून, आपल्या कामातील अनुभव त्या कुटुंबीयांशी आणि मित्रमैत्रिणींशी नेहमी शेअर करत असत. मागील एक वर्षापासून त्या व्हीएसआर कंपनीमध्ये कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्यांनी सांताक्रुज येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सेवा दिली होती. मेहनती, शांत स्वभावाच्या आणि कामाप्रती प्रामाणिक असलेल्या पिंकी माळी यांची ओळख सहकाऱ्यांमध्ये होती.

पिंकी माळी यांच्या पश्चात त्यांचे पती, आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. एका तरुण, कर्तव्यदक्ष मुलीचे असे अचानक जाणे सर्वांसाठीच धक्कादायक ठरले आहे.

दरम्यान, या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही निधन झाले असून, गुरुवारी त्यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. तोफांची सलामी देत अजित पवार अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी व्यक्त केली आहे.

हा अपघात केवळ एक राजकीय किंवा प्रशासकीय नुकसान नाही, तर पिंकी माळी यांच्यासारख्या तरुण आयुष्यांचेही अपरिमित नुकसान आहे. या घटनेने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, प्रत्येक घरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *