Bihar Election Result Live: 1995 की 2010? बिहार कोणत्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार; मुख्यमंत्रीपदाची लढत शिगेला

0
Bihar Election Result Live: 1995 की 2010? बिहार कोणत्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार; मुख्यमंत्रीपदाची लढत शिगेला

Bihar Election Result Live: 1995 की 2010? बिहार कोणत्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार; मुख्यमंत्रीपदाची लढत शिगेला

Bihar Election Result Live: दोन टप्प्यातील मतदानानंतर मतमोजणी सुरू. एक्झिट पोलमध्ये एनडीएला आघाडी; 1995 किंवा 2010 चा इतिहास पुन्हा घडणार का याकडे लक्ष. नितीश कुमार vs तेजस्वी यादव – अंतिम निकालाची उत्सुकता.

सायली मेमाणे

१४ नोव्हेंबर २०२५ :बिहार विधानसभा निवडणूक 2025 चे निकाल आज जाहीर होत असून, राज्यात राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मतमोजणीला सकाळी सात वाजता सुरूवात झाली असून, एनडीए आणि महाआघाडी दोन्हीही बाजू विजयाचा दावा करत आहेत. 1995 मधील लालू यादवांचा ऐतिहासिक विजय की 2010 मधील नितीश कुमारांचा विक्रमी बहुमत—यापैकी कोणता इतिहास बिहार आज पुन्हा लिहिणार याचे उत्तर काही तासांतच मिळणार आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी तर दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. दोन्ही टप्प्यांत मतदान उत्साहवर्धक असून एकूण 66.91 टक्के मतदान झाले. पुरुष मतदान 62.8 टक्के तर महिला मतदान 71.6 टक्क्यांपर्यंत पोहोचले. महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मतदानाचा कल कोणत्या बाजूने आहे हे निकालांवरून स्पष्ट होईल.

दुसऱ्या टप्प्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट आघाडी दाखवण्यात आली आहे. जेडीयू, भाजप, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), हिंदुस्तान अवामी मोर्चा आणि आरएलएम या पक्षांच्या अथक प्रचारामुळे एनडीए सत्तेत पुनरागमन करेल असा अंदाज सर्वेक्षण संस्थांनी वर्तवला आहे. डीबी लाईव्ह आणि जर्नल मिरर या दोन एजन्सींनी मात्र महाआघाडी सत्तेत येऊ शकते असे वेगळे चित्र दाखवले आहे, ज्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.

एआय पॉलिटिक्स आणि अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये चुरशीची लढत होईल असे भाकीत करण्यात आले असून, त्यात एनडीएला थोडीशी आघाडी मिळताना दिसते. त्यामुळे अंतिम निकालापर्यंत अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी दोघांच्याही तळांवर आत्मविश्वास दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी तर 18 नोव्हेंबर ही शपथविधीची तारीखही जाहीर केली आहे, ज्यामुळे महाआघाडीला विजय मिळेल असा त्यांचा ठाम विश्वास दिसतो.

2010 चा विक्रम मोडण्याचीही एनडीएची इच्छा आहे. 2010 मध्ये एनडीएने तब्बल 206 जागा जिंकून इतिहास रचला होता. मात्र यंदा जेडीयूने केवळ 101 जागा लढवल्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती शक्य नाही असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजपसाठी 101 पैकी 91 जागा जिंकणे हे मोठे यश ठरेल, तर उर्वरित 41 जागांवर मित्रपक्षांचे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. विश्लेषकांच्या मते, एनडीए नेत्यांचे ‘विक्रम मोडण्याचे दावे’ काहीसे अतिउत्साही आहेत.

दुसरीकडे, 1995 चा निकाल पुन्हा मिळू शकतो अशी महाआघाडीची अपेक्षा आहे. 1995 मध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाने भक्कम विजय मिळवला होता. मात्र आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, आणि एक्झिट पोल महाआघाडीला तितका पाठिंबा दाखवत नाहीत. तरीही तेजस्वी यादव ‘1995 पेक्षा चांगला निकाल’ आल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत.

मतमोजणी जसजशी पुढे जाते आहे, तसतसे बिहारच्या पुढील पाच वर्षांचे राजकीय भविष्य ठरणार आहे. राज्यात नितीश कुमार यांचे पुनरागमन होईल की तेजस्वी यादव तरुण नेतृत्व म्हणून उदयास येतील—हीच सर्वांची उत्सुकता आहे. आजचा दिवस बिहारच्या इतिहासात महत्त्वाचा ठरू शकतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *