बुलढाणा: मुलाने आई-वडिलांची हत्या, शेतीच्या वादातून थरारक घटना
बुलढाणा: मुलाने आई-वडिलांची हत्या, शेतीच्या वादातून थरारक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील सवडद गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केली. शेतीच्या जमीन वादातून ही धक्कादायक घटना घडली, आरोपीला पोलिसांनी अटक केली.
सायली मेमाणे
पुणे २८ सप्टेंबर २०२५ : बुलढाणा जिल्ह्यातील सवडद गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश महादेव चोपडे (वय 31) यांनी आपल्या जन्मदात्या आई महादेव त्र्यंबक चोपडे (70) व आई कलावती महादेव चोपडे (65) यांची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर खळबळलेला आहे.
घटना काल (२७ सप्टेंबर) सायंकाळी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक दांपत्य आणि आरोपी मुलगा यांच्यात शेतीतील जमीन विकण्याबाबत वाद सुरू होता. रागाच्या भरात गणेशने दोघांवर हल्ला केला. त्यात दोन्ही आई-वडिलांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची तातडीने माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
माहितीप्रमाणे, मृत महादेव चोपडे यांना दोन मुले आहेत. आरोपी गणेश हा धाकटा मुलगा असून, दोन्ही मुलांना जमीनीचे हिस्से देण्यात आले होते. मात्र आई कलावतीबाई यांच्या नावावर असलेली जमीन विकण्याबाबत घरात वाद निर्माण झाला होता. या वादातूनच रागाच्या भरात गणेशने आपले आई-वडिलांचे जीवन संपवले.
या घटनेने स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नागरिकांनी पोलिसांकडून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
याचप्रमाणे बीड शहरातही एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मृतक यश देवेंद्र ढाका हा स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाकाचा मुलगा होता. वाढदिवस साजरा करताना भांडणातून धारदार शस्त्राने यशच्या पोटात चाकू घालून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे इतरांचा समावेश आहे का याचा शोध घेतला जात आहे. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज काटे यांच्यात वाढदिवस साजरा करताना भांडण झाल्याचे समोर आले आहे, आणि यावरूनच हत्या घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत दिसून आले आहे.
ही दोन्ही घटना राज्यातील वाढती गुन्हेगारी, कुटुंबीय व आर्थिक वादातून होणाऱ्या हिंसेचे चिंताजनक उदाहरण आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांची दक्षता आणि तत्काळ कारवाई या प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी महत्त्वाची ठरते.