Bullet Train Update: बुलेट ट्रेनचा प्रवास आता स्वप्न नाही! 15 ऑगस्ट 2027 रोजी मिळणार पहिले तिकीट

0
Bullet Train Update: बुलेट ट्रेनचा प्रवास आता स्वप्न नाही! 15 ऑगस्ट 2027 रोजी मिळणार पहिले तिकीट

Bullet Train Update: बुलेट ट्रेनचा प्रवास आता स्वप्न नाही! 15 ऑगस्ट 2027 रोजी मिळणार पहिले तिकीट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी घोषणा झाली आहे. 15 ऑगस्ट 2027 पासून तिकीट विक्री सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने सेवा सुरू केली जाणार आहे. संपूर्ण माहिती वाचा.


पुणे २ जानेवारी २०२६ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प असून, त्याची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा करत 15 ऑगस्ट 2027 रोजी या बुलेट ट्रेनचे पहिले तिकीट खरेदी करता येईल, अशी माहिती दिली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत देशाला ही ऐतिहासिक भेट मिळणार असून, भारतीय रेल्वे प्रवासाच्या इतिहासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प केवळ वेगासाठी नव्हे, तर आधुनिक, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासासाठी ओळखला जाणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला केला जाईल. त्यामुळे संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू न होता, आधी काही निवडक टप्प्यांवर सेवा सुरू होईल.

सर्वात आधी गुजरातमधील सुरत ते बिलिमोरा हा 47 किलोमीटरचा भाग कार्यान्वित होणार आहे. या टप्प्यावर सिव्हिल वर्क आणि ट्रॅक-बेडचे काम जवळपास पूर्ण झाले असून, हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात प्रगत भाग मानला जात आहे. त्यानंतर वापी ते सुरत आणि पुढे वापी ते अहमदाबाद असे टप्पे पूर्ण केले जातील. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ठाणे ते अहमदाबाद हा टप्पा त्यानंतर सुरू होईल आणि अखेरीस मुंबई ते अहमदाबाद असा संपूर्ण कॉरिडॉर कार्यान्वित केला जाईल.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या यशाचाही उल्लेख केला. वंदे भारत गाड्यांमुळे देशातील प्रवाशांचा हाय-स्पीड ट्रेनवरील विश्वास वाढला असून, आता बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या यशानंतर वंदे भारत स्लीपर गाड्यांचीही घोषणा करण्यात आली असून, जानेवारी 2026 मध्ये कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, संपूर्ण 508 किमी मार्गापैकी सुमारे 352 किमी गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमध्ये, तर 156 किमी महाराष्ट्रात आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, जवळपास 85 टक्के मार्ग हा उन्नत व्हायाडक्टवर बांधला जात आहे. आतापर्यंत 326 किमी लांबीचे उन्नत स्ट्रक्चर पूर्ण झाले असून, मार्गावरील 25 नद्यांवरील पुलांपैकी 17 पुलांचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पात जपानी शिनकानसेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावण्यास सक्षम असेल. सुरक्षितता, वेळेची बचत आणि प्रवासातील आराम या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे. मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून, व्यापार, उद्योग आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणारी तिकीट विक्री ही भारताच्या हाय-स्पीड रेल्वे युगाची अधिकृत सुरुवात मानली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *