CREDAI Pune Property Expo 2026: ‘पूना ते पुणे’ संकल्पनेतून 24व्या आवृत्तीचा भव्य शुभारंभ
CREDAI Pune Property Expo 2026: ‘पूना ते पुणे’ संकल्पनेतून 24व्या आवृत्तीचा भव्य शुभारंभ
CREDAI Pune Property Expo 2026 चा भव्य शुभारंभ पुण्यात झाला. 80 हून अधिक विकासकांचे 400+ महारेरा-नोंदणीकृत प्रकल्प, परवडणाऱ्या घरांपासून आलिशान प्रकल्पांपर्यंत सर्व पर्याय एकाच छताखाली.
पुणे १६ जानेवारी २०२६ : क्रेडाई पुणेच्या वार्षिक आणि बहुप्रतिक्षित ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ च्या २४व्या आवृत्तीचा भव्य शुभारंभ आज पुण्यात पार पडला. ‘पूना ते पुणे’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे उद्घाटन ५ एफ वर्ल्ड, जीटीटी डेटा आणि हनीवेल ऑटोमेशन इंडियाचे अध्यक्ष तसेच झेन्सार टेक्नॉलॉजीजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड येथे हे प्रदर्शन १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असणार आहे.

पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे गृहखरेदीदार, गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांसाठी एक सर्वसमावेशक व्यासपीठ ठरले आहे. या प्रदर्शनात परवडणाऱ्या घरांपासून ते आलिशान निवासी प्रकल्प, को-लिव्हिंग, सीनियर लिव्हिंग, एनए प्लॉट्स, प्रीमियम व्हिला तसेच ग्रेड ‘ए’ व्यावसायिक प्रकल्पांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा ८० हून अधिक नामांकित आणि विश्वासार्ह विकासक सहभागी झाले असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरातील ४०० पेक्षा अधिक महारेरा-नोंदणीकृत प्रकल्प एकाच छताखाली सादर करण्यात आले आहेत.
उद्घाटन सोहळ्याला क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष अरविंद जैन, जे.पी. श्रॉफ, नितीन न्याती, रविंद्र डी. हिटनल्ली तसेच संयोजक पुनीत ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विकासक, वित्तीय संस्था, चॅनल पार्टनर्स आणि संभाव्य गृहखरेदीदार एकाच विश्वासार्ह मंचावर एकत्र आले आहेत.
प्रदर्शनाच्या एक दिवस आधी क्रेडाई पुणेच्या वतीने D2C 3.0 या भारतातील सर्वात मोठ्या विकासक–चॅनल पार्टनर नेटवर्किंग परिषदचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेला १,००० हून अधिक चॅनल पार्टनर्सची विक्रमी उपस्थिती लाभली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून मार्गदर्शन, AI आधारित विक्री संकल्पना आणि ज्येष्ठ विकासकांकडून बाजारातील ट्रेंड्सवर चर्चा करण्यात आली, ज्यामुळे रिअल इस्टेट बाजारातील सकारात्मक वातावरण अधोरेखित झाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांनी सांगितले की, क्रेडाई पुणे एक्स्पो हे केवळ प्रदर्शन नसून विश्वास, पारदर्शकता आणि दर्जेदार विकासकांचे प्रतीक आहे. येथे सहभागी असलेले सर्व विकासक हे क्रेडाई पुणे आणि महारेरा-नोंदणीकृत असून, त्यामुळे गृहखरेदीदारांना सुरक्षित आणि सुज्ञ निर्णय घेणे सोपे होते. मागील वर्षी १८ हजारांहून अधिक अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट दिली होती, तर यंदा हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
क्रेडाई पुणेचे उपाध्यक्ष अरविंद जैन यांनी सांगितले की, २४ वर्षांचा अनुभव आणि सातत्यपूर्ण सुधारणा यामुळे हे प्रदर्शन रिअल इस्टेट उद्योगासाठी एक बेंचमार्क ठरले आहे. चॅनल पार्टनर्स, खरेदीदार आणि विकासक या तिन्ही घटकांसाठी हे व्यासपीठ ‘विन-विन’ ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गणेश नटराजन यांनीही अशा प्रदर्शनांमुळे गृहखरेदी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनते, असे मत व्यक्त केले. तत्काळ आकर्षक ऑफर्स, गृहकर्ज सहाय्य, लकी ड्रॉ आणि विविध उपक्रमांमुळे पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे घर शोधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information